Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन आज भारतात लॉन्च; पहा काय आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

पहा काय आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Xiaomi 11 Lite 5G NE (Photo Credits: Xiaomi)

Xiaomi ने आपला 11 Lite 5G NE स्मार्टफोन आज भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने आपल्या ट्विटर आणि इतर सोशल मीडिया चॅनेलवरून हँडसेटच्या लॉन्च इव्हेंटची माहिती दिली होती. शाओमी 11 लाइट 5G NE मध्ये 6.55-इंच चा FHD+ AMOLED डिस्प्ले 2400x1080 पिक्सेल रिझोल्यूशन सह दिला आहे. यात 60/90 HZ चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 780G प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा सेल 2 ऑक्टोबरला मध्यरात्री सुरु होईल. हा फोने तुम्ही mi.com आणि amazon.in खरेदी करू शकता

फोटोग्राफीसाठी या मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम दिला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा टेलीमॅक्रो स्नॅपर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रन्ट-कॅमेरा देण्यात आला आहे. (Xiaomi कडून 100W वायरलेस चार्जिंग स्टँड लॉन्च, अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार फोन)

Xiaomi India Tweet:

या स्मार्टफोनमध्ये 4250mAh ची बॅटरी देण्यात आली असून 33W चा फास्ट चार्जिंग सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth v5.2, 4G LTE, a USB Type-C port, GPS/ A-GPS, 5G, NFC, IR Blaster दिले असून साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिला आहे.

हा मोबाइल Truffle Black, Bubblegum Blue, Peach Pink आणि Snowflake White या चार कलर्समध्ये उपलब्ध आहे . हा स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 23,499 रुपये इतकी असून 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 25,499 रुपये इतकी आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif