US: ऍपल वॉच हरवल्यानंतर $ 40,000 ची फसवणुक झाल्याचा महिलेचा दावा, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण
यूएसमधील एका महिलेने दावा केला आहे की यूएसमधील फ्लोरिडा येथील डिस्ने वर्ल्डमध्ये राइड दरम्यान तिचे ऍपल वॉच गमावल्यानंतर $ 40,000 ती क्रेडिट कार्ड फसवणुकीची बळी ठरली आहे.
यूएसमधील एका महिलेने दावा केला आहे की यूएसमधील फ्लोरिडा येथील डिस्ने वर्ल्डमध्ये राइड दरम्यान तिचे ऍपल वॉच गमावल्यानंतर $ 40,000 ती क्रेडिट कार्ड फसवणुकीची बळी ठरली आहे. एका वृत्तानुसार त्या महिलेचे Apple Watch गमावले होते. महिले कडे हर्मीस एडिशन ऍपल वॉच होती ज्याची किंमत $1,300 आहे. राइडवर बसल्यावर घड्याळ खाली पडली होती. "महिला तिचे घड्याळ पाहू शकत होती, परंतु ती राइडमध्ये बसलेली असल्यामुळे ती ते घड्याळ परत घेऊ शकत नव्हती,"
रविवारी उशिरा आलेल्या अहवालात म्हटले आहे की, तिच्याकडे अनेक क्रेडिट कार्डे घड्याळाशी लिंक केलेले होते, ज्यामध्ये अमर्यादित क्रेडिट लाइन असलेले अमेरिकन एक्सप्रेस कार्ड होते. तिच्या कार्ड मधून एकूण $40,000 शुल्क काढण्यात आले. त्यानंतर महिलेला हरवलेल्या घड्याळाशी क्रेडिट कार्डेची माहिती लिंक असल्याचे आठवले. अधिकारी कार्ड कुठे वापरले गेले याचा तपास सुरु आहे. डिस्ने सिक्युरिटीला देखील सूचित केले गेले," असे अहवालात नमूद केले आहे. तथापि, हरवलेल्या ऍपल वॉचमुळे क्रेडिट कार्डची फसवणूक झाली असण्याची शक्यता कमी आहे . Apple Watch हे मनगटातून काढून टाकल्यानंतर सुरक्षिततेसाठी स्वयंचलितपणे लॉक होते आणि पेमेंट करण्यापूर्वी ते अनलॉक करण्यासाठी पिन मागते.
(The above story first appeared on LatestLY on May 23, 2022 06:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

