Bumble डेटिंग अॅपची सीईओ Whitney Wolfe बनली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला; Tinder शी झालेल्या वादानंतर उभी केली स्वत: ची कंपनी
बंबल हे एक असे डेटिंग अॅप आहे जिथे महिला फर्स्ट मूव्ह घेतात. यामुळे महिलांना नियंत्रण आणि आत्मविश्वास मिळतो असे व्हिटनी म्हणते. बंबलचे जगभरात 40 दशलक्षाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत, त्यामध्ये 25 लाखाहून अधिक पेड वापरकर्ते आहेत.
डेटिंग अॅप बंबलची (Bumble) सीईओ आणि सह-संस्थापक व्हिटनी वुल्फ हर्ड (Whitney Wolfe Herd) जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला (Youngest Self-Made Woman Billionaire) ठरली आहे. गुरुवारी अमेरिकेच्या बाजारात सूचीबद्ध होणारी ही दुसरी सर्वात मोठी डेटिंग कंपनी बनली आहे. कंपनीमधील 12 टक्के हिस्सेदारीसह व्हिटनी सर्वात तरुण महिला अब्जाधीश झाली. तिचे वय केवळ 31 वर्षे आहे. बंबलचे शेअर्स, आयपीओमध्ये 43 डॉलर प्रती शेअर्स पासून सुरुवात होऊन 76 डॉलर प्रती शेअर पर्यंत पोहोचले. या बम्पर लिस्टिंगमुळे कंपनीचे बाजार मूल्यांकन 14 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1 लाख कोटी रुपयांनी वाढले. गुरुवारी व्हिटनीची एकूण संपत्ती वाढून 1.5 बिलिअन डॉलर्सवर गेली,
याबाबत वुल्फ हर्डने ट्विट केले की, ‘आज बंबल ही एक सार्वजनिक कंपनी बनली आहे व हे शक्य झाले कारण 1.7 अब्ज स्त्रियांनी आमच्या अॅपवर पहिले पाऊल टाकले. ज्यामुळे आमच्यासाठी व्यवसाय जगतातील मार्ग उघडला. आजचा दिवस सत्यात उतरवल्याबद्दल सर्वांचे आभार.’
व्हिटनी वुल्फ हर्ड पूर्वी बंबलचे प्रतिस्पर्धी डेटिंग अॅप टिंडरची सह-संस्थापक होती. तिने टिंडरच्या संस्थापकांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता त्यानंतर तिने कंपनीमधून राजीनामा दिला. तिचा माजी बॉस आणि बॉयफ्रेंड जस्टिन मेटेनने तिला टिंडर को-फाउंडरचे पद हिसकावून घेण्याचीही धमकी दिली असल्याचे तिने सांगितले होते. नंतर टिंडरने हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि आता हे प्रकरण मिटविण्यात आले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच वर्षी 2014 मध्ये व्हिटनीने बंबलची सुरुवात केली. 2019 मध्ये Blackstone Inc ने 3 अब्ज डॉलर्समध्ये बंबल मधील 'मॅजेरिटी स्टेक' विकत घेतला आणि व्हिटनी हर्ड कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी राहिली. (हेही वाचा: पॉर्न स्टार Stormy Daniels चा मोठा खुलासा; Donald Trump सह SEX संबंध माझ्या आयुष्यातले सर्वात वाईट 90 सेकंद)
बंबल हे एक असे डेटिंग अॅप आहे जिथे महिला फर्स्ट मूव्ह घेतात. यामुळे महिलांना नियंत्रण आणि आत्मविश्वास मिळतो असे व्हिटनी म्हणते. बंबलचे जगभरात 40 दशलक्षाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत, त्यामध्ये 25 लाखाहून अधिक पेड वापरकर्ते आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)