31 मार्चपासून 'या' स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp; इथे पहा यादी

त्याची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सेफ्टी अॅप्स (Photo Credit : Pixabay)

Meta च्या मालकीचं व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात हे अ‍ॅप आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. आता स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कम्पॅटीबिलिटी असते.पण जस जशी सॉफ्टवेअर जुनी होत जातात तशी त्याला व्हॉट्सअ‍ॅप कडून हटवली देखील जातात. Android, iOS आणि KaiOS वरील काही फोन्समध्ये आता 31 मार्चपासून व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट नसेल. त्याची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आता अ‍ॅन्ड्रॉईड डिव्हाईस व्हर्जेन 4 आणि खालील मध्ये काम करणं थांबावणार आहे. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, युजर्सला नंबर आणि एसएमएस नंबर देऊन ते व्हॅलिडेट करावं लागणार आहे. KaiOS version 2.5 मध्येच केवळ व्हॉट्सअ‍ॅप चालणार आहे. तर jailbroken असलेल्या आयफोनच्या वापराला बंदी असणार आहे. हे देखील नक्की वाचा: Jio Calendar Month Validity Plan: जिओने लाँच केला 259 रुपयांचा ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ प्रीपेड प्लॅन; ग्राहकांना मिळणार 'हे' फायदे .

कोणत्या फोनमध्ये बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप 

टेक्नोलॉजीनुसार होणारे बदल युजर्सना देण्यासाठी अशाप्रकारचे अपडेट्स दिले जातात.