'व्हॉट्सॲप'मधील Android च्या डूडल मध्येही लवकरच दिसणार सर्च बार
लवकरच व्हॉट्सॲपमधील डुडल (Doodle) फीचरमधील इमोजी आणि स्ट्रिकरमध्ये search बार जोडला जाणार आहे.
WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी सातत्याने काही नवे अपडेट्स देत असते. सुरुवातीला केवळ चॅटिंगसाठी असलेले हे मेसेजिंग ॲप आता अनेक स्वरूपात वापरता येते. अनेक युजर्स व्हॉट्सॲपचा वापर करून फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर करतात. मग त्यांच्यासाठी व्हॉट्सॲप एन नवं फिचर अपडेट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच डुडल (Doodle) फीचरमधील इमोजी आणि स्ट्रिकरमध्ये search बार जोडला जाणार आहे. यामध्ये युजर्सना स्ट्रिकर आणि इमोजी सर्च करण्याचा पर्याय खुला होणार आहे. Group Invitation Control Feature ते Dark Mode, 'व्हॉट्सॅप'वर महिन्याभरात दिसणार ही '5' खास फीचर्स
WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप अँड्रॉइड व्हर्जनमधील डुडल फीचरमध्ये बदल करणार आहे. फोटोवर डुडल लावून पाठवायचा असेल तर यापूर्वी ते लिस्टमधून शोधावं लागत होतं. मात्र आता याकरिता सर्च बार दिला जाणार आहे. त्यामुळे थेट सर्च करूनच स्टिकर किंवा इमोजी शोधून त्याचा वापर करता येणार आहे.
यंदा व्हॉट्सॲपने दहा वर्ष पूर्ण केली आहेत. मागील दहा वर्षांमध्ये यामध्ये अनेक बदल झाले आहेत. दिवसेंदिवस अधिकाधिक युजर्सना आकर्षिक करण्यासाठी व्हॉट्सऍप या मेसेजिंग ॲपमध्ये बदल केले जातात.