WhatsApp युजर्सला Picture In Picture मोडमध्ये पाहता येणार ShareChat व्हिडिओ

त्यामुळे युजर्सला चॅटिंग करताना अधिक मजा येणार आहे. कंपनीने लेटेस्ट बीटा वर्जन रोलआउट केले असून यामध्ये युजर्सला मल्टी वॉलपेपर फिचर्स मिळणार आहे.

WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

इंस्टंट मॅसेजिंग WhatsApp येत्या काही दिवसात त्यांच्या युजर्ससाठी एक नवे फिचर्स आणि अपडेट उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे युजर्सला चॅटिंग करताना अधिक मजा येणार आहे. कंपनीने लेटेस्ट बीटा वर्जन रोलआउट केले असून यामध्ये युजर्सला मल्टी वॉलपेपर फिचर्स मिळणार आहे. याच व्यतिरिक्त युजर्सला Picture In Picture मोडमध्ये ShareChat व्हिडिओ सुद्धा पाहता येणार आहे. हे लेटेस्ट बीटा वर्जन iOS आणि Android मध्ये मिळणार आहे.(WhatsApp लवकरच घेऊन येणार शानदार फिचर, एकाचवेळी 4 स्मार्टफोन करता येणार Access)

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp मध्ये युजर्सला ShareChat व्हिडिओ सपोर्ट सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. म्हणजेच युजर्सला WhatsApp चॅटमध्ये ShareChat व्हिडिओ सुद्धा पाहता येणार आहे. खासियत अशी की, हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅटिंगच्या बाहेर येणे जरुरी नाही, कारण युजर्सला पिक्चर-इन-पिक्चर मोड मध्ये पाहता येणार आहे. या व्यतिरिक्त लेटेस्ट बीटा अपडेट्स मध्ये iOS युजर्सला मल्टी वॉलपेपर फिचर्स सुद्धा मिळणार आहे. कंपनी iOS युजर्सला चॅटमध्ये वॉलपेपर कस्टमाइयजेशनवर काम करत असून लवकरच लाईव्ह केली जाणार आहे. यानंतर युजर्सला विविध चॅटमध्ये आपल्या आवडीचे वॉलपेपर्स सेट करता येणार आहे.(फेसबुक मेसेंजर चे नवे App Lock फिचर; Face आणि Touch ID ने करु शकाल अॅप अनलॉक)

रिपोर्टमध्ये असे ही सांगण्यात आले आहे की, WhatsApp च्या अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्सला लवकरच बीटा वर्जन मध्ये ShareChat व्हिडिओ सपोर्ट इनेबल करण्याची सुविधा मिळणार आहे. कंपनी ही सर्विस हळूहळू सर्व युजर्सला उपलब्ध करुन देणार आहे. नवे फिचर आल्यानंतर युजर्सला ShareChat व्हिडिओला WhatsApp मध्येच प्ले करता येणार आहे. यासाठी फक्त व्हिडिओ पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये प्ले होणार आहे. दरम्यान, आता पर्यंत WhatsApp कडून अधिकृत घोषणा केलेली नाही. पण समोर आलेल्या रिपोर्टनुसार अशी आशा केली जात आहे की, युजर्सला नव्या फिचर्ससाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार नाही आहे.