सावधान! Whatsapp Bug मुळे डिलीट होतोय डेटा? सुरक्षेसाठी वापारा हा पर्याय

मात्र, काही टीप्सच्या माध्यमातून तुम्ही Whatsapp Bugच्या त्रासापासून दिलासा मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला आपला व्हाट्सअॅप चॅट बॅकअप तयार करावा लागेल. त्यासाठी खालील माहिती वाचा.

Whatsapp Bug | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Whatsapp Tips and Tricks in Marathi : व्हाट्सअॅप वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटमधील डेटा सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा विचार करा. Whatsapp Bug हा वापरकर्त्याच्या नकळत त्यांचा चॅट डेटा डिलिट करत असल्याचे वृत्त आहे. Whatsapp Bug वापरकर्त्याच्या कोणत्याही अनुमतीशिवाय त्यांच्या चॅट डेटा डिलिट करत असल्याचा दावा अनेक ऑनलाईन रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. व्हाट्सअॅप वापरणाऱ्या अनेक युजर्सनीही असा दावा केला आहे. हे वृत्त आल्यानंतर Whatsapp प्रवक्त्यांनीही या वृत्ताची पुष्टी करत म्हटले आहे की, Whatsapp Bug बाबत आम्हालाही माहिती मिळाली आहे. आमची यंत्रणात तपास करत आहे. लवकरच या समस्येपासून युजर्सची मुक्ती केली जाईल.

प्राप्त माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर बारीक नजर ठेऊन असलेली बेबसाईट WABetaInfoने याबात पहिल्यांदा वृत्त दिले. एका युजर्सच्या स्क्रीनशॉट पोस्ट करत WABetaInfoने दिलेल्या वृत्तात ही समस्या पहिल्यांदा मांडण्यात आली. त्यानंतर अनेक युजर्सनीही या वृत्ताला दुजोरा देत आपल्या तक्रारी लिंक केल्या.

ट्विटरच्या माध्यमातून Magic023 नावाच्या एका युजरने लिहिले की, जून 2018 पासून आपण Whatsapp Bug चा सामना करत आहोत. मी जून 2018 पासून हा त्रास सहन करत आहे. मी माझे अनेक महत्त्वाचे मेसेज गमावून बसलो आहे. मी Whatsapp ला कितीतरी ईमेल केले. आता तर त्यांनी मला उत्तरच देणे बंद केले आले. मी माझा फोन रिसेटही केला. दुसरा फोनही विकत घेतला तरीही ही समस्या माझी पाट सोडत नाही. (हेही वाचा, जुने मेसेज अचानक गायब होण्याच्या तक्रारींवर WhatsApp कडून देण्यात आलं 'हे' उत्तर!)

सुरक्षेसाठी वापारा हा पर्याय

दरम्यान, या त्रासापासून सुटका करण्यासाठी व्हाट्सअॅपने आतापर्यंत कोणतेही अधिकृत फिचर लॉन्च केल्याची माहिती नाही. मात्र, काही टीप्सच्या माध्यमातून तुम्ही Whatsapp Bugच्या त्रासापासून दिलासा मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला आपला व्हाट्सअॅप चॅट बॅकअप तयार करावा लागेल. चॅट बॅकअप बनविण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला Whatsapp ओपन करुन सेटींगमध्ये जावे लागेल. इथे आपल्याला एक पर्याय (ऑप्शन) मिळेल. हा पर्याय निवडताच आपण चॅट बॅकअपवर जाल. आता बॅकअप टू गूगल ड्राईव्ह अॅक्टीव (कार्यन्वीत) करा. इथे आपण आपल्या सोईनूसार बॅकअप फ्रिक्वेन्सी सेट करु शकता. त्यानंतर भलेही आपले चॅट डिलिट झाले तरी, आपण ते पुन्हा रिस्टोअर करु शकते.