WhatsApp मध्ये लवकरच Boomerang फिचर येणार
सोशल मीडियावरील युजर्सच्या पसंदीचे अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच इन्स्टाग्रामवरील (Instagram) बुमरॅंन्ग (Boomerang) फिचर घेऊन येणार आहे.
सोशल मीडियावरील युजर्सच्या पसंदीचे अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच इन्स्टाग्रामवरील (Instagram) बुमरॅंन्ग (Boomerang) फिचर घेऊन येणार आहे. आता पर्यंत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज, व्हिडिओ, फोटो किंवा GIF फाइल्स एखाद्याला पाठवता येत होते. मात्र आता या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करणे अधिक मजेशीर होणार आहे.
WABetaInfo यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपवर बुमरॅंन्ग फिचर देण्यात येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला बुमरॅंन्ग पद्धतीने व्हिडिओ बनवता येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला सुद्धा बुमरॅंन्ग व्हिडिओ पोस्ट करु शकता येणार आहेत. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये व्हिडिओ फक्त GIF फाइल्समध्ये रुपांतर करण्याचे फिचर देण्यात आले आहे. मात्र या GIF फाइलची वेळ केवळ 7 सेकंदापेक्षा कमी आहे. मात्र बुमरॅंन्ग पद्धतीने व्हिडिओ बनवल्यास तो आता 7 सेकंदापेक्षा जास्त असू शकणार आहे.(iPhone युजर्स आता Facebook, WhatsApp वरुन कॉल करु शकणार नाहीत?)
बुमरॅंन्ग फिचर प्रथम आयफोन युजर्सला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर अँन्ड्रॉइड युजर्सला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र हे फिचर कधी लॉन्च करणार असल्याचे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलेले नाही.