Whatsapp Privacy: जाणून घ्या आनंद तेलतुंबडे, बेला भाटिया, रवीन्द्रनाथ भल्ला, शालिनी गेडा आणि इतरांबद्दल ज्यांचे स्मार्टफोन Spyware Pegasus वापरुन करण्यात आले टॅप

स्पाईवेयर पेगसासच्या माध्यमातून भारतातील काही महत्त्वाच्या लोकांच्या WhatsApp मध्ये घुसून हेरगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे भारतातील नागरिक आणि त्यांचे खासगी आयुष्यच धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Whatsapp Privac | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

स्पाईवेयर पेगसासच्या माध्यमातून भारतातील काही महत्त्वाच्या लोकांच्या WhatsApp मध्ये घुसून हेरगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे भारतातील नागरिक आणि त्यांचे खासगी आयुष्यच धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. कधीत प्रकारे ही हेरगिरी केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या दैनिकाने पीडितांच्या नावासह प्रसिद्ध केली आहेत. यात आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde), बेला भाटिया (Bela Bhatia), रवीन्द्रनाथ भल्ला (Rabindranath Bhalla), शालिनी गेडा (Shalini Gera), सीमा आजाद (Seema Azad), सरोज गिरी (Saroj Giri), यांसारख्या दलित चळवळीचे नेते, लेखक, पत्रकार, प्रोफेसर वकील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. जाणून घेऊया ही व्यक्तिमत्व कोण आहेत. ज्यांचा WhatsApp मध्ये घुसून हेरगिरी करण्याचा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे.

आनंद तेलतुंबडे

आंदन तेलतुंबडे हे एक प्रोफेसर, स्कॉलर, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखक आहे. भारतातील जाती व्यवस्था आणि संघर्ष यांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. दलितांच्या अधिकारासाठी ते विशेष कार्यकरत आङेत. सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये अध्यापन करतात. त्यांनी आतापर्यंत 9 पुस्तके लिहिली आहेत. आनंद तेलतुंबडे हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारांचे पाईक म्हणून ओळखले जातात. भीमा-कोरेगांव हिंसा प्रकरणात एका व्यापक तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

बेला भाटिया

छत्तीसगढ राज्यातील बस्तर येथील यांचीही व्हाट्सऐपच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आली आहे. बेला भाटीया या राजकीय दडपशाहीविरोधात लढतात. त्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या सीएसडीएसच्या एसोसिएट फेलोसोबतच टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायसन्सेचच्या मानद प्रोफेसही राहिल्या आहेत. ग्रामीण भारतातील दलित, अदिवासी, वंचित आदीच्या हक्कासाठी त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. (हेही वाचा, WhatsApp युजर्ससाठी Pegasus स्पायवेयरचा मोठा धोका, जाणून घ्या कशा पद्धतीने केली जातेय हेरगिरी)

रवींद्रनाथ भल्ला

रवींद्रनाथ भल्ला हे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते तेलंगणा उच्च न्यायालयात वकील आहेत. तसेच, कमोटी फॉर रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रजनर्स म्हणजेच सीआरपीपीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगणाचे महासचिवही आहे. सीआरपीपीची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली होती. एसएआर गिलानी याचे पहिले अध्यक्ष होते. भीमा-कोरेगांव प्रकरणात अटक करण्यात आलेले रोना विल्सन हेसुद्धा या संस्थेशी संबंधीत होते. सीआरपीपीची स्थापना वेगवेगळ्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या आणि गुन्हे दाखल केलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी करण्यात आली होती.

शालिनी गेडा

शालीनी गेडा या जगदलपूर येथे लीगल अॅड नावाची एक संस्था चालवतात. भीमा कोरेगांव प्रकरणात तुरुंगात असलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकील सुधा भारद्वाज यांच्या त्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. त्या त्यांची केसही लढवत आहेत. त्या बस्तरमध्ये राहतात. छत्तीसगढमधील राजकीय दडपशाहीविरोधात त्या सातत्याने लिहीत आणि आवाज उठवत आल्या आहेत.

सीमा आजाद

उत्तरप्रदेश पोलिसांनी 2010 मध्ये सीमा आजाद यांचे पती विश्वविजय यांच्यासोबत अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्यावर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप ठेवला होता. कालांतराने दोघांचीही सुटका झाली. सीमा आजाद दस्तक नावाचे मासिक प्रकाशित करतात. ते पीयूसीएलसोबत जोडले गेले आहे. त्या मानवाधिकार कार्यकर्ता आहेत आि कविताही लिहितात.

सरोज गिरी

सरोज गिरी हे दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवतात. ते मानवाधिकार विषयावर चिंतन मांडतात. ते अदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने लिहीत बोलत आले आहेत.

दरम्यान, शुभ्रांशु चौधरी (बीबीसी माजी पत्रकार) , आशीष गुप्ता (मानवाधिकार कार्यकर्ता, मुक्त पत्रकार), निहाल सिंह राठौड (नागपूर येथील वकील), अंकित ग्रेवाल (वकील), जगदीश मेश्राम (गडचिरोली येथील मानवाधिकार कार्यकर्ते), विवेक सुंदर (मुंबई येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते), राजीव शर्मा (पत्रकार, दिल्ली), संतोष भारतीय (माजी खासदार, जनता दल), अजमल खान (मानवाधिकार कार्यकर्ते), सिद्धात सिब्बल (पत्रकार दिल्ली) , अमर सिंह चहल ( वकील, चंडीगढ), डिग्री प्रसाद चौहान (मानवाधिका कार्यकर्ते, छत्तीसगढ) यांचीही हेरगिरी करण्यात आल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now