WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप मध्ये 7 दिवसानंतर आपोआप डिलीट होणार पाठवलेले मेसेजेस, जाणून घ्या काय आहे हे Disappearing Messages फिचर

हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर असे मेसेज पाठवू शकतो जे सात दिवसात आपोआप डिलीट होतील.

WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

जग हळूहळू जवळ येतय यात सर्वात मोठा हात टेक्नोलॉजीचा जितका आहे तितका व्हॉट्सअॅप (WhatsApp) चा देखील आहे. व्हॉट्सअॅप हा तर प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भागच बनला आहे. अनेक महत्त्वाची कामे तसेच मित्र-परिवारासोबत विचारांची देवाणघेवाण या अॅपच्या माध्यमातून होते. त्यासोबत यावर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल सुद्धा करू शकतो. यात दिवसेंदिवस नवनवे बदल करण्यात आले. त्यात आता Disappearing Messages नावाचे एक नवे फिचर आले आहे. याच्या माध्यमातून तुम्ही एखाद्याला पाठवले मेसेजेस तुम्हाला अनावश्यक वाटत असल्यास ते 7 दिवसानंतर ऑटोमेटिक डिलीट होऊ शकतात.

या फिचरमध्ये कोणतेही मेसेजेस 7 दिवसानंतर डिलीट होतील. हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर असे मेसेज पाठवू शकतो जे सात दिवसात आपोआप डिलीट होतील. या फिचरचा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप चॅट दोन्ही सेक्शनमध्ये वापर करता येईल. Whatsapp Business Customers: व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी 'या' युजर्संला भरावे लागणार पैसे; कंपनीने दिली माहिती

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फिचरचा जुन्या मेसेजेसवर किंवा आलेल्या मेसेजेसवर (received message) कोणताही परिणाम होणार नाही. कोणत्याही युजरने सात दिवस व्हॉट्सअॅप उघडलं नाही तरीदेखील मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रिव्ह्यू किंवा नोटिफिकेशनमध्ये मेसेज दिसेल.

Disappearing मेसेजला कोट करुन जर त्यावर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मेसेज डिलीट होणार नाही. Disappearing मेसेज कोणालाही फॉरवर्ड केला असेल, परंतु ज्याला मेसेज फॉरवर्ड केलाय त्याच्यासाठी Disappearing मेसेज ऑफ असेल तर फॉरवर्डेड मेसेज डिलीट होणार नाही.

कोणत्याही युजरने मेसेज Disappear होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतला असेल तर तो मेसेज बॅकअपमध्ये राहील. त्यामुळे तो मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल, परंतु तो युजर जेव्हा बॅकअप रिस्टोर करेल, तेव्हा तो मेसेज त्याच्याकडे पुन्हा दिसेल.