WhatsApp वर आले 'हे' नवे फिचर्स, जाणून घ्या

तर व्हॉट्सच्या या 10 वर्षाच्या काळात व्हॉट्सअॅमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. मात्र व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये सुद्धा युजर्सला अपडेटेड फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

WhatsApp Image (Photo Credits: PixaBay)

सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय व्हॉट्सअॅप त्यांच्या युजर्ससाठी बदलत्या ट्रेन्ड नुसार त्याच्या अॅपमध्ये बदलाव करत असतो. तर व्हॉट्सच्या या 10 वर्षाच्या काळात व्हॉट्सअॅमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. मात्र व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये सुद्धा युजर्सला अपडेटेड फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

युजर्सला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चॅटिंग सोईस्कर करुन देण्यासाठी कंपनीने बेस्ट सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फिचर्स लॉन्च केले आहेत. तर व्हॉट्सअॅपसाठी देण्यात आलेल्या या नव्या फिचर्सबद्दल आताच जाणून घ्या.

>>फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड फिचर

फेक न्यूज किंवा चुकीची माहिती पोहचण्यावर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने हे फिचर आणले आहे. या फिचरअंतर्गत युजर्सला फॉरवर्ड केलेला मेसेज यापूर्वी सुद्धा दुसऱ्याला पाठवण्यात आला आहे हे समजणार आहे. तसेच फॉरवर्ड केलेला मेसेज अन्य दुसऱ्याला पाठवत आहे याबद्दल नोटिफिकेशन मिळणार आहे.

>>कॉन्जिक्युटिव व्हॉइस मेसेज

व्हॉट्सअॅपमच्या या फिचरमध्ये युजर्सला आलेले व्हॉइस मेसेज एका पेक्षा अधिक असल्यास ते एकाच वेळी ऐकता येणार आहेत. यासाठी युजर्सला आलेला फक्त व्हॉइस मेसेज प्ले करायचा आहे. त्यानंतर आलेले अन्य व्हॉइस मेसेज सुद्धा प्ले होणार आहेत. तसेच दुसरा व्हॉइस मेसेज सुरु होण्यापूर्वी त्याचे नोटिफिकेशन देण्यात येणार आहे.

>>ग्रुप इन्विटेशन

व्हॉट्सअॅपमध्ये काही दिवसांपूर्वीच Group Invites फिचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे फिचर वापरण्यासाठी युजर्सला त्याबद्दल सेटिंग मध्ये जाऊन सुरु करावे लागणार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या कडे ज्या व्यक्तींचे क्रमांक सेव्ह केलेले आहेत त्यांनाच या ग्रुप मध्ये अॅड करता येणार आहे. मात्र जर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये अॅड केले असता त्यासाठी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमची परवानगी मागण्यात येणार आहे.(आयफोन युजर्सला आता स्वत:च्या चेहऱ्याचा इमोजी WhatsApp वर वापरता येणार)

>>सेव्ह प्रोफाइल पिक्चर

व्हॉट्सअॅपवरील युजर्सची माहिती गुप्त ठेवण्यासाठी सिक्युरिटी असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरील प्रोफाइल फोटो सेव्ह किंवा कॉपी करता येणार नाही आहे. यापूर्वी युजर्सला एखाद्याचा फोटो अन्य व्यक्तीला फॉरवर्ड किंवा सेव्ह करता येत होता. मात्र ग्रुपसाठी हे फिचर काम करत नाही पण ग्रुप आयकॉन युजर्स सेव्ह करु शकतात.

तसेच काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपसाठी इन्स्टाग्रामला देण्यात आलेले बुमरॅंन्ग फिचर येणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु अद्याप त्यावर व्हॉट्सअॅपकडून कोणती ही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.