तुम्ही Apple iPhone वापरता? तर मग WhatsApp तुमच्यासाठी Update सह आणतंय नवीन डिझाइन

व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन वापरकर्त्यांसाठी नवीन डिझाइन आणण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये एक अर्धपारदर्शक टॅब बार आणि नेव्हिगेशन बार आहे. व्हॉट्सअॅपने अॅपल आयफोन वापरकर्त्यांसाठी नवीन डिझाइन आणण्यास सुरुवात केली आहे.

WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

WhatsApp New Design for Apple iPhone: तुम्ही जर अॅपल आयफोन वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन वापरकर्त्यांसाठी नवीन डिझाइन आणण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये एक अर्धपारदर्शक टॅब बार आणि नेव्हिगेशन बार आहे. व्हॉट्सअॅपने अॅपल आयफोन वापरकर्त्यांसाठी नवीन डिझाइन आणण्यास सुरुवात केली आहे. Apple iPhone साठी नवीन WhatsApp डिझाइनमध्ये एक अर्धपारदर्शक टॅब बार (Translucent Tab Bar) आणि नेव्हिगेशन बार (Navigation Bar) आहे. नवीन डिजाईन आपणास मिळाले नसेल तर आपण आपले व्हॉट्सअॅप अपडेट करु शकतात. WhatsApp चे नवे व्हर्जन इंस्टॉल करावे.

WABetaInfo ने दिलेल्या नुसार, नवीन इंटरफेससाठी नवीन अपडेट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एकदा अॅप रीस्टार्ट करावे लागेल. "तुमच्याकडे हे फिचर नसल्यास, अधिकृत चेंजलॉगमध्ये सूचित केल्याप्रमाणे थोडा काळ वाट पाहा. कारण काही वापरकर्त्यांना येत्या आठवड्यात ते उपलब्ध होऊ शकते, असे या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप कम्यूनीटीसाठी फोन नंबर प्रायव्हसी फिचर)

दरम्यान, गेल्या आठवड्यात, मेसेजिंग प्लॅटफॉर्म iOS वर पुन्हा डिझाइन केलेले स्टिकर आणि GIF पिकर मोठ्या प्रमाणावर आले होते. अॅप्लिकेशनच्या अधिकृत चेंजलॉगमध्ये नमूद केले आहे की सुधारित नेव्हिगेशनसह अपडेट केलेले स्टिकर ट्रे आता प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.