WhatsApp Images आणि Videos मुळे फोन मेमरी फुल होतेय? 'या' टेक टिप्स येतील कामी

फोन मेमरी सतत फुल होतेय? रोजचे गुड मॉर्निंग मेसेजेस, कोरोना व्हायरस संबंधित फॉरवर्ड्स यामुळे फोन मेमरी भरत आहे? आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त आहात? तर तुमच्याकडे एक सोपा पर्याय आहे.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

फोन मेमरी सतत फुल होतेय? रोजचे गुड मॉर्निंग मेसेजेस, कोरोना व्हायरस संबंधित फॉरवर्ड्स यामुळे फोन मेमरी भरत आहे? आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त आहात? तर तुमच्याकडे एक सोपा पर्याय आहे. तो म्हणजे व्हॉट्सअॅप (WhatsApp) ऑटो-डाऊनलोड (Auto-Download) पर्याय बंद करण्याचा. ऑटो-डाऊनलोडचा पर्याय बंद केल्याने व्हॉट्सअॅपवर डाऊनलोड केले जाणारे फोटोज आणि व्हिडिओज यावर तुम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकता. हा पर्याय बंद केल्याने व्हॉट्सअॅप वर आलेला फोटो, व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही डाऊनलोड करत नाही तोपर्यंत तो होणार नाही. त्यामुळे अगदी सहजच तुमची फोन मेमरी भरणे टाळले जाते. (WhatsApp Chats वर नवनवे वॉलपेपर्स कसे सेट कराल?)

कोविड-19 संकटात मोबाईल नेटवर्कमध्ये कंजेशन वाढले आहे. त्यामुळे मोबाईलच्या नेटवर्क सर्व्हिसमध्ये कमी जाणवत आहे. या मोबाईल नेटवर्कच्या बँडविडथला अधिक उत्तम बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही क्षेत्रांमध्ये डॉक्युमेंट्स, ऑडिओ आणि व्हिडिओ मेसेजेसचे ऑटो डाऊनलोड बंद केले आहे, असे व्हॉट्सअॅपने एफएक्यू (FAQ) मध्ये म्हटले आहे. जर युजर्सच्या मोबाईलमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ ऑटो-डाऊनलोड होत असतील तर ते बंद करण्यासाठी खालील स्टेप्सचा वापर करा.

ऑटो-डाउनलोड ऑफ कसे कराल?

Android युजर्ससाठी:

# व्हॉट्सअॅप ओपन करा. उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. डेटा आणि स्टोरेज युसेज या पर्यायाची निवड करा.

# मीडिया ऑटो-डाऊनलोड मध्ये तीन पर्याय असतील- when using mobile data, when connected on WiFi and when on roaming

# फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स चे सर्व बॉक्स अनचेक करा.

# त्यानंतर ओके वर क्लिक करा.

iPhone युजर्ससाठी:

# iPhone युजर्सला फोनमध्ये अनावश्यक ऑडिओ, व्हिडिओ आणि GIF पासून मुक्त ठेवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

# व्हॉट्सअॅप ओपन करा. सेटिंग्स मधील Data and storage usage पर्यायावर जा.

# युजर्स फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्ससाठी नेवर बॉक्सचा पर्याय निवडू शकतात आणि हे डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येक फाईल मॅन्युअल पद्धतीने टॅप करु शकता.

# युजर्स आपल्या आवडीनुसार केवळ वाय-फाय आणि सेलुलर इंटरनेटसाठी देखील ऑटो-डाऊनलोड ऑप्शन सेट करु शकतात.

खालील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही कॉलमध्ये वापरला जाणारा डेटा कमी करु शकता:

# सेटिग्स मध्ये Data and storage usage पर्यायावर जा.

# कॉल सेटिंग्स सेक्शनमध्ये Low Data Usage ऑप्शन इनेबल करा.

चॅटमुळे किती मेमरी व्यापली जाते याचाही अंदाज व्हॉट्सअॅप युजर्स घेऊ शकतात. त्यासाठी व्हॉट्सअॅप मधील स्टोरेज अँड डेटा युसेज पर्यायातील स्टोरेज युसेज वर जा. जर तुम्ही चॅट बॅकअपचा पर्याय केवळ वाय-फाय वरच दिलात. तर मोबाईल डेटा सेव्ह होईल. त्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करुन सेटिंग्समधील चॅट ऑप्शनवर जा. चॅट बॅकअप मधील बॅकअप ओवर पर्यायातील केवळ वाय-फाय ची निवड करा. अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअॅपमुळे फुल होणारी मेमरी टाळू शकता. जेणेकरुन तुमचे व्हॉट्सअॅप आणि इतर अॅप्स अधिक सुरळीत चालतील.