भारतीय वंशाचे नीरज अरोरा यांचा Whatsapp चीफ बिझनेस ऑफिसर पदाचा राजीनामा; कुटुंबाला देणार वेळ
व्हाट्सअॅप समूहात येण्यापूर्वी ते इंटरनेटविश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणूण ओळखल्या जाणाऱ्या 'गूगल'सोबत काम करत होते.
Neeraj Arora Resigns From His Post: भारतीय वंशाचे व्हाट्सअॅपचे (Whatsapp) चीफ बिझनेस ऑफिसर नीरज अरोरा (Neeraj Arora) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्वत: नीरज अरोरा यांनीच ही माहिती दिली. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी)चे माजी विद्यार्थी राहिलेल्या अरोरा यांनी व्हाट्सअॅपच्या खरेदीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. व्हाट्सअॅप समूहात येण्यापूर्वी ते इंटरनेटविश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणूण ओळखल्या जाणाऱ्या 'गूगल'सोबत काम करत होते. यापूर्वीही व्हाट्सअॅपचे को-फाऊंडर Jan Koum,इंन्स्टाग्रामचे को-फाऊंडर Kevin Systrom आणि फेसबुक चे Mike Krieger यांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही काळात अमेरिका बेस्ड सोशल मीडिया कंपनी फेसबुकमधून राजीनामा देणाऱ्या बड्या ऑफिसर्सची संख्या वाढत आहे. नीरज आरोरा हे सोशल मेसेजिंग आणि स्टार्टअपमध्ये 2011 पासून टॉप रॅंकिंग भारतीय अधिकारी राहिले आहेत. फेसबुकने 2014मध्ये हे स्टार्टअप 19 अरब डॉलरमध्ये खरेदी केले होते. यात अरोरा यांची भूमिका म्हत्त्वाची होती. (हेही वाचा, फ्लिपकार्ट सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा; गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप)
अरोरा यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मला विश्वास वाटतो आहे की, व्हाट्सअॅप यापुढेही साधे, सुरक्षित आणि ट्रस्टेड कम्युनिकेशन प्रॉडक्ट राहील. अरोरा यांनी आपल्या पोस्टमधून व्हाट्सअॅपचे को-फाऊंडर Jan Koum आणि Brian Acton यांनाही धन्यावद दिले आहेत.