WhatsApp Bug: व्हॉट्सअॅपमध्ये आला बग, फेस आयडी आणि टच आयडीशिवाय मिळत आहे एॅक्सेस
मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरण वैशिष्ट्यमध्ये (Bio Metric Authentication Feature) बग आला आहे. हा बग फेस आयडी आणि टच आयडीशिवाय युजर्सना व्हॉट्सअॅपचा एॅक्सेस देत आहे.
WhatsApp Bug: त्वरीत मेसेज पाठवण्यासाठी आजकाल जगभरात एकच अॅप लोकप्रिय आहे, ते म्हणजे व्हॉट्सअॅप (WhatsApp). वापरकर्त्यांना नवीन सुविधा आणि अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅप वेळोवेळी अफलातून फीचर्स घेऊन येत असते. मात्र यामध्ये काहीवेळा युजर्सना ‘व्हॉट्सअॅप बग’चाही सामना करावा लागतो. नुकतेच व्हॉट्सअॅपने आयओएस (IOS) युजर्ससाठी प्रायव्हसी स्क्रीन लॉकची सुविधा देण्यासाठी फेस आयडी (Face ID) आणि टच आयडी (Touch ID) फीचर लॉंच केले होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरण वैशिष्ट्यमध्ये (Bio Metric Authentication Feature) बग आला आहे. हा बग फेस आयडी आणि टच आयडीशिवाय युजर्सना व्हॉट्सअॅपचा एॅक्सेस देत आहे.
व्हॉट्सअॅपने स्वतः याबाबत माहिती दिली आहे, तसेच लवकरच हा बग काढून टाकण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅप अपडेट केले जाईल. एका रेडिट यूजर (Reddit User) ने या बगला शोधून काढले होते. de_X_ter नावाच्या या रेडिट यूजरनुसार, हा बग तेव्हाच काम करत आहे जेव्हा वापरकर्ते बायोमेट्रिक प्रमाणीकरण लगेच (Immediately) च्या ऐवजी आफ्टर 1 मिनिट (After 1 Minute), आफ्टर 15 मिनिट (After 15 minute) आणि आफ्टर 1 आवर (After 1 Hour) निवडतील. (हेही वाचा: नको असलेल्या WhatsApp Groups मुळे त्रस्त आहात? हे नवे फिचर करेल तुमची मदत)
दरम्यान, वापरकर्त्याला एखाद्या अॅपमधून एखादा फोटो अथवा एखादी मिडीया फाईल व्हॉट्सअॅपवर शेअर करायची असेल. तर त्यासाठी आयओएस युजर्सना फेस आयडी आणि टच आयडीची गरज भासते. मात्र युजर्सनी लगेच स्क्रीन लॉकच्या ऐवजी दुसरा कोणता पर्याय निवडला असेल तर, कोणत्याही फेस आयडी आणि टच आयडी शिवाय थेट व्हॉट्सअॅप उघडत असलेले आढळून येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)