फेक न्युज शेअरिंगला आळा घालण्यासाठी WhatsApp कडून 20 लाखाहून अधिक अकाऊंट्स बंद

इंस्टन्ट मेसेजिंग अॅप WhatsApp द्वारे फेक न्यूज पसरवण्याऱ्यांना आळा घालण्यासाठी कठोर पाऊलं उचलली आहेत.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

इंस्टन्ट मेसेजिंग अॅप WhatsApp द्वारे फेक न्यूज पसरवण्याऱ्यांना आळा घालण्यासाठी कंपनीने कठोर पाऊलं उचलली आहेत. यासाठी WhatsApp ने एक नवे 'मशीन लर्निंग सिस्टम' बनवले आहेत. या मशिनद्वारे एकाच वेळी एकसारखे मेसेज पाठवणारे अकाऊंट ओळखले जाते. यास 'ब्लक मेसेजिंग' असे म्हणतात. या लर्निंग सिस्टमद्वारे फेक न्यूज, कन्टेंट शेअर करण्याला चाप लावण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

यासंदर्भात कंपनीने सांगितले की, अनेकजण WhatsApp चा वापर चुकीच्या बातम्या पसरवण्यासाठी करतात. केवळ फेक न्यूजच नाही तर युजर्सची खाजगी, महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी काही लिंक्स पाठवल्या जातात. अशा प्रकारचे बल्क मेसेज किंवा ऑटोमॅटिक मेसेज करणे कंपनीच्या नियमांविरुद्ध आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार रोखण्यासाठी कंपनीने मशीन लर्निंग सिस्टम सुरु केली असून याअंतर्गत प्रत्येक महिन्यात 20 लाखांहून अधिक अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. (WhatsApp भारतातून काढता पाय घेण्याची शक्यता; सोशल मीडिया कंपन्यांसाठी नवा नियम सरकारच्या विचाराधीन)

कशी काम करते मशीन लर्निंग सिस्टम ?

WhatsApp ने सुरु केलेली ही नवी सिस्टम गैरव्यवहार डिटेक्ट करुन ते अकाऊंट्स बॅन करतं. त्याचबरोबर चुकीची माहिती पसरवणारे नंबर डिकेक्ट करुन त्यावर बंदी घालण्यात येते. पुन्हा त्याच नंबरवरुन रजिस्ट्रेशन केल्यास सिस्टम तो नंबर डिकेक्ट करुन पुन्हा बॅन करते. अशाप्रकारे गेल्या तीन महिन्यात 20% अकाऊंट रजिस्ट्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे. ही प्रक्रिया मॅन्युअली करणे सोपे नसल्याने या सिस्टमची निर्मिती करण्यात आली आहे.



संबंधित बातम्या