Twitter Downvote Button: ट्विटरचे डाउनव्होट बटण काय आहे? 'असा' होईल तुम्हाला फायदा
एका अहवालानुसार, ट्विटर आर्टिकल नावाच्या एका नवीन वैशिष्ट्यावर देखील काम करत आहे, जे वापरकर्त्यांना ट्विट्सवर 280 शब्दांची मर्यादा नसून लांब पोस्ट लिहिण्याची परवानगी देईल.
Twitter Downvote Button: गेल्यावर्षी ट्विटरने प्लॅटफॉर्मवर एक नवीन डाउनव्होट (Downvote) रिप्लाय फिचर्स सादर केले होते. आता अॅपचे हे फीचर ग्लोबल होणार आहे. याचा अर्थ वापरकर्ते सर्वत्र नवीन फीचरसह ट्विटला डाउनव्होट करण्यास सक्षम असतील. हे फिचर Twitter वेब वापरकर्त्यांपुरते मर्यादित आहे. त्यानंतर iOS आणि Android वापरकर्ते या फिचर्सचा लाभ घेऊ शकतात.
ट्विटरचे म्हणणे आहे की, रिप्लाय डाउनव्होट्स लपवले जातील आणि त्यामुळे ते सार्वजनिकरित्या दिसणार नाहीत. त्याऐवजी, ते प्लॅटफॉर्मला अधिक संबंधित कमेंट्स ओळखण्यात आणि त्यांना अधिक दृश्यमान करण्यात मदत करतील. तथापि, रिप्लायवरील पसंती म्हणून अपवोट्स सार्वजनिकपणे दृश्यमान असतील. (वाचा - Instagram Reels New Feature: आता इंस्टाग्राम रील्सवर 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवता येणार आहे, नवीन फीचर लवकरच होणार लाँच)
दरम्यान, Twitter ने या वैशिष्ट्याची घोषणा करताना म्हटले आहे की, "iOS वर तुमच्यापैकी काही जणांना रिप्लायवर अप आणि डाउन वोट देण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील आणि प्लॅटफॉर्म तुमच्याशी संबंधित रिप्लायचा प्रकार समजून घेण्यासाठी तुमची चाचणी करत आहे".
ट्विटरने ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, बहुतेक वापरकर्त्यांनी डाउन अॅरोवर क्लिक केले, कारण रिप्लाय एकतर आक्षेपार्ह, अप्रासंगिक किंवा दोन्ही होते. "या प्रयोगातून हे देखील दिसून आले आहे की, लोक त्यांना पाहू इच्छित नसलेली सामग्री चिन्हांकित करण्यासाठी डाउनव्होटिंग हा सर्वात सामान्यतः वापरला जाणारा मार्ग आहे,"
एका अहवालानुसार, ट्विटर आर्टिकल नावाच्या एका नवीन वैशिष्ट्यावर देखील काम करत आहे, जे वापरकर्त्यांना ट्विट्सवर 280 शब्दांची मर्यादा नसून लांब पोस्ट लिहिण्याची परवानगी देईल. ज्या वापरकर्त्यांना जास्त शब्दांची पोस्ट करायची आहे, त्यांच्यासाठी हे फिचर अधिक सोयीस्कर असू शकते. त्यामुळे त्यांना यापुढे एकाच थ्रेडमध्ये अनेक ट्विट करण्याची आवश्यकता नसणार आहे.