Whats App: आता व्हॉट्स अॅपचा नवा प्रायवेसी अपडेट, प्रत्येक वापरकर्त्याला पुरवणार डिजीटल झेड सिक्युरिटी

आता तुम्ही कुणाबरोबर चॅट करत असल्यास इतरांपासून तुम्हाला तुमचं ऑनलाईन स्टेटस हाईड करायचं असल्यास आता तुम्ही सहज हाईड करु शकता.

WhatsApp | Representational Image (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप (Whats App) कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट (Update) घेवून येताना दिसतो. जगभरात (World Wide) व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची (Users) संख्या मोठी आहे. पण यावेळी व्हॉट्स अॅप (Whats App) तुमच्या प्रायवेसी (Privacy) बाबत एक भन्नाट अपडेट (Update) घेवून आलं आहे. या अपडेट नुसार आता तुम्ही तुमचं व्हॉट्स अॅप (Whats App) ऑनलाईन (Online) स्टेटस हाईड करु शकता. तुम्ही कुणाबरोबर चॅट (Chat) करत असल्यास इतरांपासून तुम्हाला तुमचं ऑनलाईन स्टेटस (status) हाईड (Hide) करायचं असल्यास आता तुम्ही सहज हाईड करु शकता. म्हणजे तुम्ही चॅट (chat) करत असलेल्या व्यक्ती व्यतिरीक्त तुम्ही ऑनलाईन (Online) असल्याचं कुणालाही कळत नाही.

 

जाणून घ्या कसं अक्टीव्हेट कराल तुमच्या व्हॉट्स अपवर हे फिचर:- 

 

यापूर्वी तुम्ही व्हॉट्स अपवर कुणाबरोबर चॅट (Chat) करत असल्यास किंवा तुम्ही ऑनलाईन (Online) असल्याचं तुमच्या व्हॉट्सअपवरील (Whats App) सगळ्या कॉनटॅक्टसला (Contacts) दिसायचं. पण आता तुम्ही तुमच्या एच्छिक कॉन्टॅक्टलाचं तुमचं ऑनलाईन (Online) स्टेटस दाखवू शकता. तुम्हाला काही लोकांपासून तुमचं ऑनलाईन स्टेटस लपावयचं असल्यास आता ते सहज शक्य आहे. तरी संबंधीत फिचर (Feature) तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप अपडेट (whats app update) करावं लागेल.