Vodafone ने आणला नवा प्रीपेड प्लान, 70 दिवसांच्या वैधतेसह 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग फक्त 299 रुपयांत
299 रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना तब्बल 70 दिवसांची वैधता मिळणार आहे.
जिओ (Jio) ला टक्कर देण्यासाठी इतर सर्व टेलिकॉम कंपन्यांची जोरदार प्रयत्न सुरु असून आता वोडाफोनने (Vodafone) आपला आणखी एक नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. 299 रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना तब्बल 70 दिवसांची वैधता मिळणार आहे. त्याचबरोबर या प्लानमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधा देखील मिळेल. तसेच या प्लानमध्ये 3GB चा डेटा वापरता येईल. मात्र हा 3GB डेटा रोजच्या वापरासाठी मिळणार नसून संपुर्ण 70 दिवसांच्या वैधतेसाठी मिळणार आहे.
इंटरनेटचा वापर कमी आणि कॉलिंगचा अधिक वापर करणा-या ग्राहकांचा विचार करुन हा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये 1000 एसएमएस देखील वापरायला मिळतील. कंपनीने 2 दिवसांपूर्वी 229 रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला होता. मात्र ह्या प्लानची वैधता केवळ 28 दिवसांची होती. तसेच दिवसाला 2GB म्हणजे एकूण 56GB चा डेटा वापरता येईल.
याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा देखील आहे. तसंच दररोज 100 एसएमएस देखील करता येतील. 229 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना व्होडाफोन प्ले अॅपचा मोफत अॅक्सेस मिळेल. म्हणजेच ग्राहक लाइव्ह टीव्ही, चित्रपट आणि अन्य अनेक कार्यक्रम व्होडाफोन प्लेवर मोफत पाहू शकतात.