Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता रिचार्जसह Health Insurance चा घेता येणार लाभ
या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) सुद्धा दिला जाणार आहे.
टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया (Vodafone-Idea) यांनी आपले दोन जुने प्लॅन पुन्हा एकदा ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) सुद्धा दिला जाणार आहे. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 51 रुपये आणि 301 रुपये आहे. हे दोन्ही कॉम्बो प्रीपेड प्लॅन्स असून यामध्ये युजर्सला आदित्य बिर्ला हेल्थ इंश्युरन्स दिला जाणार आहे. या संदर्भात कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नियम आणि अटींबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तर जाणून घ्या या प्लॅन बद्दल अधिक माहिती.
वोडाफोन आयडिया यांनी युजर्सला त्यांच्या 51 आणि 301 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये हेल्थ इंश्युरन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार युजर्स जर 10 दिवस रुग्णालयात उपचार घेत असेल तर त्याला प्रतिदिनी 1 हजार रुपये तर आयसीयु मध्ये असलेल्या व्यक्तीला प्रतिदिनी 2 हजार रुपये दिले जाणार आहेत. या हेल्थ इंश्युरन्सचा लाभ 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींना घेता येणार आहे. Vi Hospicare नावाचे हा प्लॅन उपलब्ध आहे. यामध्ये मिळणारा बिमा युजर्सला खासगीआणि आयुष रुग्णालयातून घेता येऊ शकतो. कंपनीने हे सुद्धा स्पष्ट केले आहे की, अपघाताप्रकरणी हेल्थ इंश्युरन्ससाठी पहिल्याच दिवशी क्लेम करता येणार आहे. तर अन्य प्रकरणी 10 दिवसांच्या आतमध्ये क्लेम करावा लागणार आहे. त्यानंतर डिस्चार्ज सर्टिफिकेश दाखवून रुग्णालयात खर्च झालेले पैसे मिळणार आहेत.(आता फुकटात Twitter सुरु ठेवता येणार नाही? या सर्विससाठी प्रतिमहिना मोजावे लागणार 350 रुपयांचा शुल्क)
तर कंपनीच्या 51 रुपयांच्या प्लॅन बद्दल बोलायचे झाल्यास त्याची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये युजर्सला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या व्यतिरिक्त 500 एसएमएस आणि डेली 1.5GB डेटा सुद्धा दिला जाणार आहे. तर 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला डेली 2GB डेटा दिला जाणार असून त्याची वॅलिडिटी 28 दिवसांची असणार आहे.