आता फुकटात Twitter सुरु ठेवता येणार नाही? या सर्विससाठी प्रतिमहिना मोजावे लागणार 350 रुपयांचा शुल्क
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर आता युजर्सला पूर्णपणे फुकटात वापरता येणार नाही आहे अशी अफवा सध्या पसरली आहे. मात्र ही गोष्ट खरी असून ट्विटरच नव्हे तर त्याची खास सर्विस सुपर फॉलो (Super Follow) सर्विससाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत.
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर (Twitter) आता युजर्सला पूर्णपणे फुकटात वापरता येणार नाही आहे अशी अफवा सध्या पसरली आहे. मात्र ही गोष्ट खरी असून ट्विटरच नव्हे तर त्याची खास सर्विस सुपर फॉलो (Super Follow) सर्विससाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. हे एक पेड सब्सक्रिप्शन बेस्ड असणार असून सुपर फॉलो नावाने त्याला ओळखले जाणार आहे. याअंतर्गत कंटेट आणि हाय प्रोफाइल एकाउंट एक्सेस करण्यासाठी पेमेंट करावे लागणार आहे. या फिचर सर्विसच्या माध्यमातून ट्विटरला आपल्या रेवेन्यूमध्ये नफा होणार आहे. त्याचसोबत कंटेट क्रिएटर्सला सुद्धा यामधून पैसे मिळू शकतात. परंतु हे फिचर कधी लॉन्च केले जाईल याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचसोबत भारतातील लॉन्चिंग बद्दल ही काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
The Verge च्या रिपोर्ट्सनुसार, ट्विटरच्या नव्या सुपर फॉलो सर्विसच्या माध्यमातून क्रिएटर्सला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कमाई करता येणार आहे. यासाठी कंटेट क्रिएटर्स आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून प्रतिमहिना 4.99 डॉलर्स (जवळजवळ 350 रुपये) प्रमाणे चार्ज करु शकतात. म्हणजेच ट्विटरवर फॉलोअर्सला खास कंटेट पाहण्यासह न्यूजलेटर मिळवण्यासाठी प्रत्येक महिना 350 रुपये शुल्क मोजावा लागणार आहे. यामध्ये ट्विटरची सुद्धा हिस्सेदारी असणार आहे. पण ट्विटरकडून त्यांच्या भागीदारी बद्दल सुद्धा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.(Tiktok ला टक्कर देण्यासाठी Facebook ने लाँच केलं BARS अॅप; जाणून घ्या काय आहे खास)
दरम्यान, ट्विटर एक नवे सेफ्टी मोड चे ट्रायल करत आहे. त्यानुसार ट्विटरने असे म्हटले आहे की, ज्याला कम्युनिटीज (Communities) नावाने ओळखले जाणार आहे. हे एक फेसबुक ग्रुप फिचर्ससारखेच असणार आहे. लोकांना खास इवेंटससाठी ग्रुप तयार करता येणार असून त्यात अन्य लोकांना सुद्धा अॅड करता येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2021 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

