Airtel आणि Vi चा खास प्लॅन; 49 रुपयांच्या फ्री प्लॅनमध्ये मिळवा 'या' सुविधा

दोन्ही कंपन्या सर्वसाधारणपणे सारख्याच प्रकारच्या ऑफर्स देत आहेत.

एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) ने प्रीपेड ग्राहकांसाठी (Prepaid Users) दोन खास ऑफर जाहीर केल्या आहेत. दोन्ही कंपन्या सर्वसाधारणपणे सारख्याच प्रकारच्या ऑफर्स देत आहेत. एअरटेल 49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) फ्री (Free) मिळणार असून तर दुहेरी लाभांसाठी 79  रुपयांचा प्लॅन आहे.  सध्याच्या कोविड-19 संकटाच्या काळात एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी हे खास प्लॅन्स सादर केले आहेत.

एअरटेल प्लॅन:

एअरटेलच्या 49 रुपयांचा प्रीपेड प्लॅन फ्री आहे. मात्र ही वन टाईम ऑफर आहे. त्यामुळे तुम्ही या प्लॅनचा केवळ एकदा लाभ घेऊ शकता. या 49 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्संना 38.52 रुपयांचा टॉकटाईम आणि 100MB डेटा मिळणार आहे. हा 100MB डेटा संपल्यानंतर 0.50 रुपये प्रति MB युजर्सकडून आकारण्यात येतील. या प्लॅनची व्हॅलिटीडी 28 दिवसांची आहे. एअरटेलच्या या नव्या ऑफरतर्फे आम्ही 55 मिलियन पेक्षा अधिक लोकांना एकत्रित आणत आहोत आणि ही ऑफर ग्रामीण भागातील लोकांना अधिक लाभदायी ठरेल. जर ही ऑफर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही काही दिवस वाट पाहून पुन्हा चेक करावे.

यासोबतच 79 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एअरटेलतर्फे दुहेरी फायदे देण्यात येत आहेत. या प्लॅनमध्ये 400MB डेटा 0.60 रुपये प्रति मिनीट कॉलरेट आणि 56 दिवसांची व्हॅलिटीडी देण्यात आली आहे. या सर्व सुविधा यापूर्वी 128 रुपयांच्या प्लॅनमध्ये देण्यात येत होत्या. हा प्लॅन वन टाईम आहे किंवा नाही याची माहिती अद्याप कळलेली नाही.

वोडाफोन आयडीया प्लॅन:

वोडाफोन आयडीयाने देखील 60 मिलियन युजर्ससाठी नवीन ऑफर सादर केली आहे. 49 रुपयांचा प्लॅन फ्रीमध्ये दिला जात आहे. यामध्ये 38 रुपयांचा टॉकटाईम 100 MB डेटा आणि 28 दिवसांची व्हॅलिटीडी असणार आहे. ही ऑफर युजर्ससाठी केवळ वन टाईम असणार आहे. व्हीआयने आरसी79 चा नवा कॉम्बो व्हाऊचर देखील लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्संना 128 रुपयांचा टॉकटाईम 200 MB डेटा आणि 28 दिवसांची व्हॅलिटीडी मिळणार आहे. ही ऑफर मर्यादीत काळासाठी असून लवकरच एक्स्पायर होईल.

युजर्स नक्कीच या प्लॅन्सचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे जिओने देखील आपल्या युजर्ससाठी अशा प्रकारचे प्लॅन्स सादर केले आहेत.