Vivo V21e 5G स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता; पहा किंमत आणि वैशिष्ट्यं
बहुप्रतिक्षित वीवो व्ही21 5जी स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. त्यापूर्वी चायनीज ब्रँडच्या या स्मार्टफोनबद्दल अधिकृत ट्विटर हँटलवरुन माहिती देण्यात आली आहे.
बहुप्रतिक्षित वीवो व्ही21 5जी (Vivo V21e 5G) स्मार्टफोन (Smartphone) भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. त्यापूर्वी चायनीज ब्रँडच्या या स्मार्टफोनबद्दल अधिकृत ट्विटर हँटलवरुन माहिती देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात हा स्मार्टफोन लॉन्च होणार असून वीवोच्या लोकप्रिय व्ही21 सिरीजमधील हे लेटेस्ट अॅडिशन आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वीवो व्ही21 चे सर्वात स्वस्त व्हर्जन असेल. याची किंमत भारतात 29,990 रुपये इतकी असू शकेल. (Vivo V21 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन)
या फोनमध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+AMOLED डिस्प्ले 2404X1080 पिक्सल रिज्योल्यूशन सह दिला आहे. तसंच MediaTek Dimensity 700 chipset प्रोसेसर 8जीबी रॅम+256जीबी स्टोरससह देण्यात आला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून इंटरनल स्टोरेज वाढवता येईल.
Vivo India Tweet:
Vivo V21e 5G स्मार्टफोनमध्ये 4400mAh ची बॅटरी 44 व्हॅट फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या फोनमध्ये तुम्हाला रॅम वाढवण्याचे अनोखे फिचर मिळेल ज्याचा वापर करुन तुम्ही फोनचा स्पीड वाढवू शकाल. हा मोबाईल अॅनरॉईड 11 वर आधारित फनटच OS 11.1 वर कार्यरत आहे.
फोटोग्राफीसाठी यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच व्हिडिओ कॉलिंग, सेल्फीसाठी 44MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)