व्हॉट्सअ‍ॅपचं 'Vacation Mode' आता 'Ignore Archived Chats'म्हणून येणार? बीटा व्हर्जनवर झलक

“Ignore archived chats”हे अजूनही सर्वत्र उपलब्ध झाले नाही मात्र लवकरच त्याचे अपडेट येऊ शकतात.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

जगभरातील लोकप्रिय 'व्हॉट्सअ‍ॅप' (WhatsApp) हे मेसेजिंग अ‍ॅप आता युजर्सना लवकरच 'व्हेकेशन मोड' हे फीचर देणार आहे. यामुळे युजर्सना काही काळ मेसेजेसपासून आराम मिळवण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यासाठी मागील अनेक दिवसांपासून मागणीदेखील होत होती. मात्र आता हे फीचर 'व्हेकेशन मोड' (Vacation Mode) ऐवजी “Ignore Archived Chats” म्हणून पाहता येणार आहे.

WhatsApp beta व्हर्जनमधील Android 2.19.101 मध्ये हे फीचर पहायला मिळालं आहे. लवकरच युजर्सना सार्‍याच प्लॅटफॉर्मवर हे फीचर पाहता येणार आहे. खोटी माहिती, अफवा रोखण्यासाठी WhatsApp ने सादर केले ‘चेकपॉइंट टिपलाइन’; असा करा वापर

कसं पहाल?

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर सेटिंग्स मध्ये नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल. मागील वर्षभरापासून व्हेकेशन मोड बद्दल काम सुरू होते. आता लवकरच हे फीचर पाहता येणार आहे.

“Ignore archived chats” या फीचरमुळे तुम्हांला ग्रुप न सोडता किंवा समोरच्याला थेट न फसवता मेसेज टाळणं सोप्प होणार आहे. या मोडमध्ये असताना तुम्हांला नवा मेसेज येणार नाही. पूर्वी Archived chats हे नवा मेसेज आल्यानंतर आपोआपच unarchived होत असतं.

“Ignore archived chats”हे अजूनही सर्वत्र उपलब्ध झाले नाही मात्र लवकरच त्याचे अपडेट येऊ शकतात.  लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर डार्क मोड, अधिक वेळेस फॉरवर्ड केलेले मेसेज सूचित करणारं चिन्ह दिसणार आहे.