Twitter संकेतस्थळ आणि अॅपची रचना बदलणार, घ्या अधिक जाणून
ट्विटर (Twitter) आज आपल्या संकेतस्थळ (Twitter Website) आणि अॅपची (Twitter App) सुधारीत अवृत्ती सादर करत आहे. कंपनीने दावा केला आहे की, संकेतस्थळाची ही नवी आणि सुधारीत अवृत्ती ही अधिक सुलभ, कमी गोंधळात टाकणारी आणि वापरण्यास अगदी सोपी असेल.
ट्विटर (Twitter) आज आपल्या संकेतस्थळ (Twitter Website) आणि अॅपची (Twitter App) सुधारीत अवृत्ती सादर करत आहे. कंपनीने दावा केला आहे की, संकेतस्थळाची ही नवी आणि सुधारीत अवृत्ती ही अधिक सुलभ, कमी गोंधळात टाकणारी आणि वापरण्यास अगदी सोपी असेल. आयओएस (iOS) आणि अँड्रॉइडवर (Android) होत असलेल्या बदलांमुळे ट्विटर नव्या अवृत्तीची अमलबजावणी करत आहे. यात नवे फॉन्ट Chirp आणि इतर काही बदल पाहायला मिळतील. ट्विटर लवकरच कलर पॅटल (Color Palettes) सुद्धा आणणार आहे.
ट्विटर टायपोफेस चिरपचा परिचय जानेवारी महिन्यातच करुन देण्यात आला होता. या आधी कंपनी SF Pro, Roboto आणि Helvetica Neue यांसारख्या फॉन्टवर अवलंबून होती. त्यामुळे युजर्सला प्रत्यक्ष भावना व्यक्त करण्यासाठी स्वत:चे व्हिज्युअल निर्माण करुन देणे हे गोल ट्विटरसमोर होते. त्यानुसार नव्या चिरपद्वारे युजर्सला, आपले व्यक्तिमत्व, उत्पादन, जाहीरात अधिक ठळकपणे मांडता येईल, असे ट्विटर म्हणते. (हेही वाचा, Twitter वर लवकरच येणार 'हे' शानदार फिचर, युजर्सला मिळणार अकाउंट लॉक किंवा बंद झाल्याची माहिती)
ट्विटरने पदार्पणावेळी त्याच्या त्याच्या व्यापक उत्पादनासाठी चिरपला टाइपफेस बनवण्यास वचनबद्ध केले नव्हते. ट्विटरच्या जागतिक ब्रँडचे क्रिएटीव्ह डायरेक्टर टेरिट डेरौन यांनी म्हटले की, ही त्यांची व्यक्तीगत इच्छा आहे. दरम्यान, ट्विटरने म्हटले आहे की, पाश्चात्या भाषा डाव्या बाजुला रेखांकीत करण्यात आल्या आहेत. त्या स्क्रोल करुन आपल्याला पाश्चात्य भाषांशिवाय तो मजकूर वाचता येईल. (आपल्या भाषेत)
ट्विटर डॉट कॉमवररती रंगसंगतीही अद्ययावत करण्यात आली आहे. यातील रंग बटनांनुसार उच् कॉन्ट्रास्ट करण्यात आल आहेत. एक उल्लेखनीय बदल असा की, ट्विटरवर निळाई बरीच कमी झाली आहे. उदा. सांगायचे तर पांढऱ्या पार्श्वभूमवीर डीफॉल्ट ट्विटर थीम वापरताना ट्विट्स आणि नेव्हिगेशन आता काळ्या रंगात बदलले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)