Threads Social App: Meta च्या Threads अ‍ॅपला पहिल्याच दिवशी युजर्सची पसंती, मस्क यांची कायदेशीर कारवाईची धमकी

इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स अ‍ॅप बनवलं आहे. थ्रेड्समध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल

Threads App (Image Credit - Mukul Sharma)

थ्रेड्स (Threads) हे नवीन सोशल मीडिया अ‍ॅप लाँच केलं असून पहिल्याच दिवशी कोट्यवधी युजर्सने थ्रेड्स (Threads) ला पसंती दर्शवली आहे. थ्रेड्स (Threads) अ‍ॅप ट्विटरला (Twitter) टक्कर आहे. पहिल्याच दिवशी थ्रेड्स व्हायरल होत आहे. थ्रेड्सच्या लाँचिंगमुळे ट्विटरला धोका निर्माण झाला आहे. ट्विटरने मेटाच्या थ्रेड्सवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. (हेही वाचा - Zuckerberg vs Musk: ट्वीटरच्या Elon Musk कडून Meta वर कायदेशीर कारवाईचे संकेत)

ट्विटरने मेटाच्या नवीन थ्रेड्स प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटरने मेटाच्या नवीन थ्रेड्स अ‍ॅपवर कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. यासंदर्भात ट्विटरचे वकील अ‍ॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्रही पाठवलं आहे. थ्रेड्सचं स्वरुप ट्विटरसारखाच असल्याचा दावा ट्विटरने केला आहे. याशिवाय ट्विटरवर थ्रेड नावाचं फीचर आहे.

मेटा कंपनीने थ्रेड्स हे नवीन मायक्रोब्लॉगिंग अ‍ॅप लाँच केलं आहे. इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स अ‍ॅप बनवलं आहे. थ्रेड्समध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल. थ्रेड्सची फिचर्स आणि संवाद साधण्याची पद्धत ट्विटरप्रमाणे आहेत. थ्रेड्स भारतासह 100 देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. तुम्ही गुगल प्ले-स्टोअरवरून थ्रेड्स अ‍ॅप डाउनलोड करु शकता. तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंटवरून थ्रेड्सवर अकाऊंट सुरु करु शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif