IPL Auction 2025 Live

Twitter Down: अनेक युजर्सचे ट्विटर डाऊन

ट्विटर डॉट एन (TWTR.N) नेही या वृत्तास दुजोरा देत शुक्रवारी (17 एप्रिल) रात्री उशीरा म्हटले आहे की, असंख्य ट्विटर युजर्सनी (Twitter Users) ट्विटर डाऊन(Twitter Down) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले.

Twitter Down | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

ट्विटर (Twitter) अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे पुढे येत आहे. ट्विटर डॉट एन (TWTR.N) नेही या वृत्तास दुजोरा देत शुक्रवारी (17 एप्रिल) रात्री उशीरा म्हटले आहे की, असंख्य ट्विटर युजर्सनी (Twitter Users) ट्विटर डाऊन(Twitter Down) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ट्विटर डाऊन झाल्याचे लक्षात आले. सध्या समस्येचे निराकरण करण्याचे काम सुरु आहे. समस्यांचे निराकरण करुन ट्विटर लवकरच आपल्या सेवेत हजर होईल, असे ट्विटरने म्हटले आहे

अनेक युजर्सचे ट्विटर हँडल लोड होत नाही किंवा ट्विट पोस्ट करता येत नाही. आम्ही समस्येचे निराकरण करत आहोत. लवकरच आपण आपल्या टाईमलाईनवर याल असे कंपनीने म्हटले आहे. उटेज मॉनिटरिंग वेबसाइट ( outage monitoring website) म्हटल्यानुसार सुमारे 40,000 युजर्सना ही समस्या शुक्रवारी जाणवली. (हेही वाचा, Pakistan मध्ये Facebook, Twitter, Instagram, TikTok वर तात्पुरता बॅन; Anti-French Protests चा परिणाम)

डाउनडेक्टर युजर्सच्या अडचणी ट्रॅक करते. या ट्रॅकींगमध्ये समोर आले की अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत. त्यांना ट्विटर वापरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आऊटेजमुळे युजर्सना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान, सर्व समस्यांचे निराकरण करुन लवकरच सेवेत परत येऊ अशी दिलासादायक माहिती ट्विटरने आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.