Twitter Down: Twitter चा वेग मंदावला, युजर्सला रिट्वीट करणे झाले अश्यक
त्यामुळे आता युजर्सला एखादे ट्वीट रिट्वीट करण्यास अडथळा येत आहे. तसेच ट्वीटरवर युजर्सला ट्वीटसह टाइमलाइनमधील घडामोडी पाहायच्या असल्यास 'Something Went Wrong' असा मेसेज दाखवला जात आहे
जगभरात आज पुन्हा एकदा ट्वीटरचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आता युजर्सला एखादे ट्वीट रिट्वीट करण्यास अडथळा येत आहे. तसेच ट्वीटरवर युजर्सला ट्वीटसह टाइमलाइनमधील घडामोडी पाहायच्या असल्यास 'Something Went Wrong' असा मेसेज दाखवला जात आहे. यापूर्वी ट्वीटर बंद झाले होते त्यावेळी 'रिट्वीट करु शकत नाही. त्यामुळे थोडावेळाने पुन्हा प्रयत्न करुन पहा' असा मेसेज दाखवण्यात येत होता.
ट्वीटरची ही समस्या वेबसाईटसह अॅपला सुद्धा दाखवत आहे. काही युजर्स ट्वीट करु शकतात पण केलेले ट्वीट आणि मेसेज सुद्धा दाखवला जात नसल्याची तक्रार करत आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया:
तसेच युजर्सने सोशल मीडियावरील विविध माध्यमांच्यामातून ट्वीटर खरच बंद झाले आहे का हे तपासून पाहिले. मात्र अद्याप अधिकृतरित्या यावर कोणताही सुचना देण्यात आलेली नाही. परंतु युजर्सला ट्वीट करताना येणारा अडथळा पाहून खरच ट्वीटर कंपनीत काहीतरी समस्या आल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.