Twitter Down: Elon Musk यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून तिसऱ्यांदा ट्विटर डाउन; वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात येत आहेत समस्या

पुन्हा प्रयत्न करूया.' अशा आशयाचा संदेश पाहायला मिळत आहे. वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलमध्ये बराच काळ प्रवेश करू शकले नाहीत.

Twitter Down | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Twitter Down: गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा ट्विटर डाऊन (Twitter Down) झाले. अचानक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने स्वयंचलितपणे वापरकर्त्यांना लॉग आउट केले. वापरकर्त्यांना तेथे त्रुटी संदेश दिसत होता. ट्विटर लॉग इन करताना वापरकर्त्यांना येथे 'काहीतरी चूक झाली, पण रागावू नका- तुमची चूक नाही. पुन्हा प्रयत्न करूया.' अशा आशयाचा संदेश पाहायला मिळत आहे. वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलमध्ये बराच काळ प्रवेश करू शकले नाहीत. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात एलोन मस्क (Elon Musk) यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे.

Downdetector वेबसाइटनुसार, दिल्ली, नागपूर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक शहरांमध्ये आउटेजची नोंद झाली आहे. एरर मेसेज पाहिल्यानंतर अनेक वेळा रिफ्रेश करूनही वापरकर्ते लॉग-इन किंवा लॉगआउट करू शकले नाहीत. डेस्कटॉप आणि मोबाईल वापरकर्ते दोन्ही समस्यांना तोंड देत होते. Downdetector हा एक प्लॅटफॉर्म आहे जो जगभरातील वेबसाइटचा मागोवा घेतो आणि वेबसाइट काम करत आहे की नाही याचा अंदाज देतो. (हेही वाचा -Twitter Down: पुन्हा ट्विटर डाउन? ट्विटरवर प्लॅटफॉर्म आउटेज आल्याने वापरकर्त्यांकडून ट्विटर डाउन ट्रेण्ड)

सकाळी 7.13 पासून येत आहेत समस्या -

IST सकाळी 6.05 वाजता, डाउनडिटेक्टरने सांगितले की 10,000 पेक्षा जास्त लोकांनी प्लॅटफॉर्मवर समस्या नोंदवल्या. DownDetector ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, वापरकर्ता अहवाल दर्शविते की ट्विटर 7:13 EST पासून समस्या अनुभवत आहे. Twitter ला आंतरराष्ट्रीय आउटेज येत आहे जे मोबाईल अॅप आणि सूचनांसह वैशिष्ट्यांवर परिणाम करत आहे. ही घटना देश-स्तरीय इंटरनेट व्यत्यय किंवा फिल्टरिंगशी संबंधित नाही, असंही नेटब्लॉक्सने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - Twitter ने खरोखरच हटवले Suicide Prevention Feature? सीईओ Elon Musk यांनी दिले उत्तर)

11 डिसेंबरलाही होते ट्विटर डाउन -

याआधी 11 डिसेंबर रोजी ट्विटर डाउन झाले होते. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटर आउटेजची तक्रार केली होती. बर्‍याच वापरकर्त्यांनी दावा केला की, ते त्यांची टाइमलाइन देखील रीफ्रेश करू शकले नाहीत.