Twitter Down Again! एलन मस्क यांच्याकडे मालकी आल्यावर ट्विटर पुन्हा डाऊन, जगभरातील युजर्सना समस्या

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर डाऊन (Microblogging Site Twitter Down) झाले आहे. आउटेज मॉनिटरिंग वेबसाइट Downdetector.com ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील असंख्य ट्विटर युजर गुरुवारी (16 फेब्रुवारी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश करु शकले नाही. एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे मालकी आल्यानंतर ट्विटर पुन्हा एकदा डाऊन झाले आहे.

Twitter | (Photo Credit - File Image)

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर डाऊन (Microblogging Site Twitter Down) झाले आहे. आउटेज मॉनिटरिंग वेबसाइट Downdetector.com ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील असंख्य ट्विटर युजर गुरुवारी (16 फेब्रुवारी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश करु शकले नाही. एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे मालकी आल्यानंतर ट्विटर पुन्हा एकदा डाऊन झाले आहे. अनेक युजर्सना ट्विटरवर फिचर्स दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या. ज्यामुळे मायक्रो-ब्लॉगिंग साइट वापरताना युजर्सना अडचणी आल्या, असे Downdetector ने म्हटले आहे. युनायटेड स्टेट्समध्ये 8,000 हून अधिक युजर्सनी मायक्रो-ब्लॉगिंग साइटसह समस्या नोंदवल्याचे डाउनडिटेक्टरने म्हटले आहे.

डाउनडिटेक्टरने माहिती देताना म्हटले आहे की, युजर्सनी नोंदवलेल्या त्रुटी आणि ट्विटरला येणाऱ्या अडचणी याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत. तसेच पाहणीही करत आहोत. मात्र, अनेक युजर्सना आज ट्विटर डाऊनचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, आम्ही जेव्हा ट्विटर वापरण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हालाही काही समस्यांचा सामना करवा लागला. (हेही वाचा, Twitter ची भारतात मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी सुरू, अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी)

ट्विट

अब्जाधीश इलॉन मस्कने गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलरच्या बदल्यात ट्विटर टेकओव्हर केले. ट्विटरची मालकी बदलल्यानंतर Twitter ला डिसेंबरमध्ये मोठी गळती लागली. ज्यामुळे जागतिक स्तरावर ट्विटरला अडचणी उद्भवू लागल्या. प्रामुख्याने हजारो युजर्स प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकले नाहीत. तसेच, सेवा पूर्ववत होण्यासाठी अनेक तास त्यांना प्रतिक्षा करावी लागली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now