Truecaller Spam Activity Indicator: अॅनरॉईड युजर्ससाठी Truecaller चे नवे फिचर; स्पॅम नंबरची अॅक्टीव्हीटी पाहता येणार
स्विडिश कॉल आयडेंटिफिकेशन अॅप Truecaller बुधवारी स्पॅम अॅक्टीव्हिटी इंडिकेटर हे नवे फिचर लॉन्च केले. हे फिचर सध्या फक्त अॅनरॉईड युजर्ससाठी उपलब्ध असून या फिचरमध्ये स्पॅम केलेल्या नंबरची माहिती मिळेल.
स्विडिश कॉल आयडेंटिफिकेशन अॅप (Swedish Caller Identification App) Truecaller बुधवारी स्पॅम अॅक्टीव्हिटी इंडिकेटर (Spam Activity Indicator) हे नवे फिचर लॉन्च केले. हे फिचर सध्या फक्त अॅनरॉईड युजर्ससाठी (Android Users) उपलब्ध असून या फिचरमध्ये स्पॅम केलेल्या नंबरची माहिती मिळेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अॅपमध्ये स्पॅम रिपोर्ट (Spam Report), कॉल अॅक्टीव्हीटी (Call Activity) आणि पीक कॉलिंग आर्स (Peak Calling Hours) हे महत्त्वाचे ट्रेंड्स आहेत.
Truecaller चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर रिशित झुनझुनवाला यांनी एका सांगितले की, भारत हा जगातील सर्वाधिक मोबाईल फोन युजर्सपैकी एक आहे. अशा परिस्थितीमध्ये गरज नसलेले कॉल्स आणि मेसेजेस यांना स्पॅम म्हणून मार्क करण्यात युजर्सच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
Truecaller Tweet:
Truecaller युजरने किती वेळा एखाद्या ठराविक नंबरला स्पॅम म्हणून मार्क केले आहे, हे स्पॅम रिपोर्टमधून कळते. तसंच या रिपोर्टमधून त्या नंबरला स्पॅम करणाऱ्यांची संख्या वाढते की कमी होते, हे ही दिसून येते. कॉल अॅक्टीव्हीटी मधून मोबाईल मधील एखाद्या नंबरने किती कॉल्स केले गेले आहेत, हे दिसून येते. पीक कॉलिंग आर्स यामध्ये स्पॅमर्स कुठल्या कालावधीमध्ये सर्वाधिक कॉल करतात हे दिसून येते.
Truecaller च्या भविष्यातील अपडेट्समध्ये फुल स्क्रिन कॉलर आयडी हे फिचर अॅड करण्याचा उद्देश आहे. या फिचरमुळे युजर्संना कॉल उचलण्यापूर्वीच निर्णय घेणे शक्य होईल. Truecaller ही कंपनी 2009 मध्ये Alan Mamedi आणि Nami Zarringhalam यांनी सुरु केले असून या कंपनीचे मुख्यालय Stockholm येथे आहे. या अॅपमध्ये दर महिन्याला 20 कोटींपेक्षा अधिक अॅक्टीव्ह युजर्स असतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)