आकर्षक फिचर्ससह ऑगस्ट महिन्यात लाँच होणारे जबरदस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
चला तर मग माहित करुन घेऊया ऑगस्ट महिन्यात लाँच होणारे स्मार्टफोन्स:
आज अख्खी दुनिया टेक्नोसॅव्ही झाली असून स्मार्टफोनच्या तालावर नाचू लागलीय असं म्हणायला हरकत नाही. महागडा किंवा आकर्षक फिचर्स असलेला स्मार्टफोन वापरणे हे जणू स्टाईल स्टेटमेंट बनलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार बाजारातही रोज नवीन लाँच होत असतात. या ऑगस्ट महिन्यातही असच काहीसे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील महिन्यातही Realme X, Redmi K20-series आणि बरेच आकर्षक स्मार्टफोन्स लाँच झाले आणि विकलेही गेले.
स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता लक्षात घेता या महिन्यातही बरेच स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. चला तर मग माहित करुन घेऊया ऑगस्ट महिन्यात लाँच होणारे स्मार्टफोन्स:
1. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10, नोट 10+ (Samsung Galaxy Note 10, Note 10+)
हे दोन्ही स्मार्टफोन्स पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. 7 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये होणा-या एका कार्यक्रमात हे स्मार्टफोन्स लाँच केले जातील. यातील सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 कॉम्पॅक्ट मॉडलमध्ये FHD स्क्रीन देण्यात आली असून प्लस मॉडलमध्ये 6.8 इंचाची QHD स्क्रीन देण्यात आली आहे. नोट 10 मध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले असून, नोट10+ मध्ये अॅडिशनल ToF सेंसर देण्यात आला आहे.
2. विवो S1 (Vivo S1)
हा विवो चा S सीरिजचा नवा अपग्रेडेड व्हर्जन असेल. हा स्मार्टफोन देखील 7 ऑगस्टला लाँच होणार आहे. मात्र हा स्मार्टफोन लाँच होण्याआधी या स्मार्टफोनचे काही फोटोज लीक झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच, तीन रियर कॅमेरे, डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि बरेच आकर्षक फिचर्स असतील. या स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- आश्चर्यम! इथे 5G चा पत्ता नाही आणि Samsung ने सुरु केली 6G ची तयारी; नवीन संशोधन केंद्राची उभारणी
3. सॅमसंग गॅलेक्सी M30s (Samsung Galaxy M30s)
ह्या स्मार्टफोनमध्ये तीन रियर कॅमेरे, 5000mAh बॅटरी आणि जलद गतीने चार्जिंग असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत 15000 रुपयांत मिळेल.
4. सॅमसंग गॅलेक्सी A10s (Samsung Galaxy A10s)
हा स्मार्टफोन सॅमसंग चा सर्वात स्वस्त असा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. यात मोठी बॅटरी आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असेल.
5. शाओमी एमआय A3 (Xiaomi Mi A3)
शाओमीचा हा तिसरा अॅनड्रॉईड वन स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन स्पेनमध्ये लाँच केला जाईल. यात 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि 48MPचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
6. एलजी डब्ल्यू30 प्रो (LG W30 Pro)
LG चा W सिरिजमधला स्मार्टफोन आहे. हा W30 आणि W10 असे दोन वेरियंट येतील. हा स्नॅपड्रॅगन 632 Soc आणि 6.2 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. त्यात 4GB आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे.
या स्मार्टफोन्सची जबरदस्त वैशिष्ट्ये ऐकून स्मार्टफोन्स प्रेमी आता हे स्मार्टफोन्स कधी लाँच होतील याकडे लक्ष ठेवून असतील.