एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रोनिक वस्तूंची काळजी कशी घ्यावी ?

फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोव्हव, एसीत्यांची नेमकी काळजी कशी घ्यावी ?

वॉशिंग मशिन (Photo Credit : Pixabay)

प्रत्येकाच्या घरातल्या आवश्यक अशा इलेक्ट्रोनिक वस्तू अगदी हमखास असतात. म्हणजेच फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोव्हव, एसी. पण त्यांची नेमकी काळजी कशी घ्यावी, हे कोणालाच माहित नव्हते. पण त्यांची योग्य ती काळजी घेतल्यास विनाकारण दुरुस्तीसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तर जाणून घेऊया या मशीन्सची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स...

AC ची अशी घ्या काळजी

- AC चा एअर फिल्टर महिन्यातून एकदा अवश्य साफ करा.

- तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जात असल्यास किंवा AC चा वापर करत नसल्यास AC चा कंप्रेसर झाकून ठेवा. त्यामुळे कंप्रेसरच्या आत धूळ जमा होणार नाही आणि AC अधिक काळ चांगला राहील.

Fridge खराब होऊ नये म्हणून

- Fridge खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची क्वाईल. म्हणूनच Fridge ची क्वाईल वेळोवेळी साफ करत राहा. ही फ्रिजच्या खालच्या बाजूला असते.

- फ्रिजमध्ये अधिक सामान ठेवू नका. कारण तुम्ही जितके अधिक सामान ठेवाल तितके ते थंड ठेवण्यासाठी फ्रिजला अधिक काम करावे लागेल. त्यामुळे फ्रिज अधिक पावर खर्च करतो.

- फ्रिजच्या दरवाज्याला असलेली रबर सील नेहमी तपासून पाहा. कारण ती खराब झाल्यास फ्रिजमध्ये गरम हवा जाण्याची संभावना असते. परिणामी फ्रिजला अधिक पावर खर्च करावी लागते आणि तो लवकर खराब होण्याची शक्यता असते.

Microwave Oven ची काळजी घेण्याच्या टिप्स

- मायक्रोव्हेवमध्ये कोणतीही वस्तू गरम करण्यासाठी ठेवल्यास मायक्रोव्हेवचा दरवाजा नीट बंद करा.

- मायक्रोव्हेव काहीही न ठेवता सुरु करु नका. याशिवाय तुम्ही इतर कोणते काम करत असाल तर टायमर अवश्य लावा. यामुळे जेवण आणि मशीन दोन्ही सुरक्षित राहतात.

Washing Machine ची अशी घ्या काळजी

- वॉशिंग मशीन खराब होण्याचे प्रमुख कारण असते ओव्हरलोडिंग. मशीनमध्ये अधिक पाणी किंवा कपडे घातल्याने ती खराब होण्याची शक्यता वाढते.

- याशिवाय वॉशिंग मशीन वेळोवेळी आतून साफ करत राहा. त्यामुळे मशीन तर साफ राहीलच पण कपड्यांनाही वास येणार नाही.

- ड्रेनज पाईपही साफ करा आणि त्यात घाण जमा होणार नाही याची खबरदारी घ्या.