TikTok वरील बंदी हटवल्यानंतरही Google आणि Apple स्टोअरवर अ‍ॅप नाही, हे आहे कारण

त्यानंतर ही अद्याप Google play store आणि Apple app store वर हे अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही.

TikTok (Photo Credits-Gettey Images)

मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) TikTok अ‍ॅपवरीव बंदी हटविली आहे. त्यानंतर ही अद्याप Google play store आणि Apple app store वर हे अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार टेक्नॉलॉजी कंपन्यांना कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर हे अ‍ॅप प्लेस्टोरवर पुन्हा दिसून येणार आहेत.

तर टिकटॉक अ‍ॅपवरील अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर टिकटॉक अ‍ॅपमुळे लहानपासून ते जेष्ठ नागरिकांमध्ये याची क्रेझ फार वाढली होती. त्यामुळे टिकटॉकवर बंदी घालण्यात यावी अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच रंजन गोगई यांच्या खंडपीठाने मद्रास न्यायालयाने या संबंधित निर्णय घेतला नाही तर टिकटॉक अ‍ॅपवरील बंदी उठवण्यात येईल असे म्हटले होते. त्यानंतर गुगल प्ले स्टोर आणि आयओएसवरुन हे अ‍ॅप हटवण्यात आले होते.(TikTok App यापुढे भारतात डाऊनलोड करता येणार, मद्रास हायकोर्टाने अ‍ॅपवरील बंदी हटवली)

या आदेशावर सुनावणी करत न्यायाधीश एन. किरुबारकरन (N Kirubakaran) आणि एसएस. सुंदर (SS Sundar) यांच्या खंडपीठाने बंदी उठवण्यात आली असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. TikTok App बीजिंग येथील एका कंपनीने बनवले आहे. या App च्या माध्यमातून युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवतात आणि ते शेअरही करु शकतात.