Tik Tok: घरबसल्या यूजर्सला मिळणार 1 लाख रुपये कमविण्याची सुवर्णसंधी
टिक टॉक च्या यूजर्सला घरबसल्या 1 लाख रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.
अल्पावधीत मोबाईल यूजर्सच्या गळयातला ताईत बनलेल्या टिक टॉक(Tik Tok)अॅपने आपल्या यूजर्ससाठी एक स्पेशल स्कीम सुरु आहे. ज्यात टिक टॉक च्या यूजर्सला घरबसल्या 1 लाख रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे. मद्रास हायकोर्टाने बंदी उठवल्यानंतर टिक टॉक अॅप पुन्हा गुगल प्ले स्टोरवर आला. त्यामुळे आपल्या नव्या यूजर्ससाठी टिक टॉकने #ReturnOfTikTok ही नवी मोहीम सुरु केली आहे.
आजकाल मोबाईल यूजर्सच्या तोंडातून एकाच अॅपचे नाव ऐकायला मिळतं ते म्हणजे टिक टॉक. ह्या अॅप लोक हवे तेव्हा हवे तितके आपले वेगवेगळे व्हिडियोज बनवून सोशल मिडियावर टाकत आहे. मग तो चित्रपटाचा एखादा डायलॉग असो, गाणं असो, वा नृत्य असो. लोकांनी ह्या टिक टॉक अॅपने अक्षरश: वेडच लावलं जणू. मात्र त्या वेडाचं प्रमाण इतकं वाढलं की , त्यामुळे यूजर्स ह्या अॅपच्या माध्यमातून आपल्या जीवावर बेतणारे व्हिडियोज बनवू लागले. त्याचाच परिणाम म्हणून मद्रास हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी ह्या अॅपवर बंदी घातली होती.
मात्र कालांतराने ही बंदी हटविण्यात येऊन टिक टॉक अॅपचे पुन्हा एकदा सोशल मिडियावर कमबॅक झाले. लोकांच्या ह्या प्रेमापायी टिक टॉक ने एक नवीन मोहिम सुरु केली. ज्यात यूजर्स दर दिवसा 1 लाख रुपये जिंकू शकतात.
त्यासाठी काय करावे लागेल?
यूजर्सना #ReturnOfTikTok हे मायक्रोसाइट पेज शेअर करावे लागणार आहे. त्यात यूजर्सला एक लिंक मिळेल. त्यावर यूजर्स आयओएस आणि अॅण्ड्रॉइडवर हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. भाग्यवान विजेत्यांना 1 लाख रुपये कमविण्याची संधी मिळू शकते.
मात्र ही स्कीम 16 मे पर्यंतच असेल. 16 मे पर्यंत दर दिवसा 3 यूजर्संना ही संधी मिळेल. आपली लोकप्रियता अशीच टिकून राहावी, आणि जास्तीत जास्त यूजर्स आपल्याशी जोडले यावे, हा टिक टॉकचा ह्या योजनेमागील उद्देश आहे.