या ट्रिकचा वापर करून आता एकाच फोनमध्ये सुरु करा दोन WhatsApp
फक्त WhatsAppच नाही तर तुमच्या फोनमधील इतर अनेक अॅप्सदेखील तुम्ही तुमच्या फोनमध्ये दोन Account अथवा दोन नंबरद्वारे सुरु करू शकता.
WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. आजकाल स्मार्टफोन आणि WhatsApp हे समीकरणच बनले आहे. दुसरे कुठले अॅप फोनमध्ये असो वा नसो मात्र WhatsApp असलेच पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या काळात बरेच लोक विविध कामांसाठी म्हणून 2 नंबर बाळगतात. मात्र WhatsApp हे फक्त एकाच नंबरवर चालू होत असल्याने दुसऱ्या नंबरचा उपयोग फक्त कॉलींगसाठी केला जातो. मात्र जर का तुमच्या दुसऱ्या नंबरवर देखील तुमच्या मोबाईलमध्येच WhatsApp सुरु झाले तर? होय असे होऊ शकते. फक्त WhatsAppच नाही तर तुमच्या फोनमधील इतर अनेक अॅप्सदेखील तुम्ही तुमच्या फोनमध्ये दोन Account अथवा दोन नंबरद्वारे सुरु करू शकता. तर फक्त फॉलो करा या टिप्स आणि सुरु करा दोन WhatsApp एकाच फोन वर.
हे करण्यासाठी तुम्हाला गरज आहे फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची
> सर्वात आधी गुगलच्या प्लेस्टोअर मध्ये जाऊन ‘Parallel Space – Multi Accounts’ हे अॅप डाऊनलोड करा.
> हे अॅप Install झाल्यानंतर समोर काही नको असलेले ऑप्शन्स येतील त्यांना स्वाईप करून हटवून टाका. त्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल.
> होमपेजवर आपल्या बरेच अॅप्स दिसतील, यातील जे कोणते अॅप आपल्याला आपल्या फोनमध्ये पुन्हा सुरु करायचे आहे त्यावर क्लिक करा.
> यानंतर नवीन विंडो ओपन होईल, या विंडोमध्ये तुम्ही तुमचा दुसरा नंबर अथवा दुसरे कोणते Account Details भरून ते अॅप नव्याने सुरु करू शकता.
> Parallel Spaceच्या होमपेजवरच एक + असे चिन्ह असलेले ऑप्शन दिसेल. त्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमधील इतर अॅप्स दिसतील जे तुम्ही पुन्हा नव्या नंबर अथवा Account ने तुमच्या फोनमध्ये सुरु करू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)