स्मार्टफोनच्या Low Memory मुळे चिंतेत आहात, तर 'या' ट्रिक्स येतील उपयोगी
जर तुम्ही अजूनही जुना स्मार्टफोन वापरत असून कमी स्टोरेज देण्यात आला आहे.अशा स्मार्टफोनचा स्टोरेज कसा वाढवू शकतो आणि त्यासाठी कोणत्या ट्रिक तुम्ही वापरु शकता हे सांगणार आहे.
गेल्या काही वर्षात स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यानी त्यांच्या स्मार्टफोनच्या स्टोरेजमध्ये मोठे बदल केले आहेत. आजकाल लॉन्च होणारे स्मार्टफोन हे 16BG ते 32GB स्टोरेज देऊ करतात. तर काही असे स्मार्टफोन आहेत त्यांचे स्टोरेज वाढवता येत नाहीत. त्यात जर तुम्ही अजूनही जुना स्मार्टफोन वापरत असून कमी स्टोरेज देण्यात आला आहे.अशा स्मार्टफोनचा स्टोरेज कसा वाढवू शकतो आणि त्यासाठी कोणत्या ट्रिक तुम्ही वापरु शकता हे सांगणार आहे.
Andriod किंवा iOs दोन्ही स्मार्टफोन युजर्संनी मोबाईलमधील नको असलेल्या फाईल डिलीट करु टाका. त्याचसोबत ई-अटॅचमेंट असलेल्या फाईल्स म्हणजेच वॉट्सअॅपवर येणारे व्हिडिओ किंवा नको असलेले फोटो डिलिट करा.
फोटो व्हिडिओ डाऊनलोड करु नका
आपण सर्वात जास्त मोबाईल मध्ये विविध फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड करतो. यासाठी तुम्ही गुगल स्टोरेज किंवा क्लाऊड स्टोरेजचा उपयोग करु शकता. त्यामुळे मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित राहतील आणि मोबाईलमधील स्टोरेज वाचवू शकता.
नको असलेले अॅप डिलिट करा
आपल्या स्मार्टफोनमध्ये असे काही अॅप असतात ज्यांमुळे मोबाईल स्टोरेज खूप स्पेस घेतात. तसेच काही वेळेस अशा अॅपचा आपल्याला उपयोग काही वेळेस होत नाही. त्यामुळे असे अॅप डिलिट केल्यास उत्तम.
स्ट्रिमिंग अॅप व्हिडिओ डाऊनलोड करु नका
व्हिडिओ स्ट्रमिंग अॅपवरुन युजर्संना आवडते कार्यक्रम ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्हिडिओ पाहता येतात. त्यामुळे असे अॅप डाऊनलोड केले जातात. मात्र या अॅपमुळे ही स्मार्टफोन स्टोरेज भरुन जाऊन 'लो मेमरी' असा संदेश दाखवला जातो.
लाईट अॅप्स डाऊनलोड करा
अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी गुगल प्ले स्टोरमध्ये लाईट अॅप्स उपलब्ध आहेत. असे अॅप्स तुमच्या मोबाईल मधील स्टोरेज वाचवण्यास मदत करतात. त्यामुळे असे अॅप डाऊनलोड जरी केले तरीही फोनमधील स्टोरेज वाचला जातो.
त्यामुळे वरील ट्रिकच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोन मधील स्टोरेजच्या चिंतेपासून सुटका होईल. त्याचसोबत तुम्हाला आवडते ते व्हिडिओ आणि फोटो तुम्ही डाऊनलोड करु शकता.