TCS Salary Hike: आयटी कंपनी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना मिळणार 12 ते 15 टक्के पगारवाढ
उर्वरित कर्मचाऱ्यांना 1.5% ते 8% ची पगारवाढ मिळू शकते.
देशातील सर्वात मोठी आयटी (IT) कंपनी टीसीएस (TCS) च्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 ते 15 टक्के पगारवाढ देऊ शकते. टाटा समूहाच्या या कंपनीला आशा आहे की, कंपनीच्या या निर्णयामुळे नोकऱ्या सोडणाऱ्या किंवा बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल. सध्या, कंपनीतील एट्रिशन रेट 20 टक्के आहे, जो या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 13 ते 14 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो.
तसेच, कंपनी कॅम्पस रिक्रूटसाठी मूळ वेतन वाढविण्याचाचाही विचार करत आहे. टीसीएसने असे केल्यास आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही असाच निर्णय घ्यावा लागू शकतो. सध्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या कमी होत आहे, परंतु टीसीएसने गेल्या आर्थिक वर्षात 44,000 कॅम्पस भर्ती केल्या आहेत. या वर्षी कॅम्पसमधून 40,000 लोकांना भरती करण्याची कंपनीची योजना आहे
मिंटच्या अहवालानुसार, टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, कंपनी उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 ते 15 टक्के पगारवाढ देण्याचा विचार करत आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना 1.5% ते 8% ची पगारवाढ मिळू शकते. गेल्या वर्षी, कंपनीने कनिष्ठ स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना 11 टक्के बोनस दिला होता, तर वरिष्ठ स्तरावर कमी बोनस दिला होता. याशिवाय, जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत कनिष्ठ अधिकाऱ्यांना 100% बोनस देण्यात आला. (हेही वाचा: Infosys Net Profit: मार्च तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक 7.8 टक्क्यांनी वाढून 6,128 कोटी रुपयांवर पोहोचला)
आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत, कंपनीने 821 नवीन कर्मचार्यांची भरती केली तर आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत ही संख्या 35,209 होती. डिसेंबर तिमाहीत टीसीएस मधील अॅट्रिशन रेट 21.3 टक्के होता, जो जानेवारी-मार्च तिमाहीत 20.1 टक्क्यांवर आला. इन्फोसिसने मार्च तिमाहीत 20.9 टक्के एट्रिशन रेट नोंदवला आहे, जो डिसेंबरच्या तिमाहीत 24.3 टक्के होता. विप्रो आणि एससीएल टेक्नॉलॉजीजने अद्याप त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेले नाहीत.