खुशखबर! Tata Sky आपल्या ग्राहकांच्या बिलाचे दर करणार कमी, आपल्या यूजर्सला परत मिळविण्याचा कंपनीचा नवा फंडा

यामुळे या यूजर्स परत मिळविण्यासाठी टाटा स्काय ने आपल्या यूजर्सच्या बिलाचे दर कमी करण्याचे ठरवले आहे.

(Photo credit: Tata Sky)

लॉकडाऊनचा (Lockdown) फटका अनेक कंपन्यांना, उद्योगधंद्यांना बसला आहे. टाटा स्काय कंपनीला देखील या लॉकडाऊनचा फटका बसला. टाटा स्कायने (Tata Sky)मार्च महिन्यात त्यांच्या SD आणि HD सेट-अप बॉक्सच्या किंमतीत वाढ केली. याचा चांगलाचा भुर्दंड टाटा स्कायला बसला. किमती वाढविल्यामुळे अनेक यूजर्स टाटा स्कायचे सब्सक्रिप्शन बंद केले आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास 15 लाख यूजर्स सोडून गेले. यामुळे या यूजर्स परत मिळविण्यासाठी टाटा स्काय ने आपल्या यूजर्सच्या बिलाचे दर कमी करण्याचे ठरवले आहे.

यासाठी टाटा स्काय आपले काही चॅनल्स बंद करणार आहेत. ज्यामुळे दरमहा येणा-या बिलाचे दर कमी केले जातील. रिपोर्टनुसार, अनेकांनी किंमती वाढल्यामुळे सब्सक्रिप्शन रिन्यूच केले नाही. या कंपनीने 12 महिन्याच्या रिचार्जवर 2 महिन्याचे सब्सक्रिप्शन मोफत केले आहे. रिचार्ज झाल्यानंतर दोन दिवसांनी कंपनी युजर्सच्या खात्यात एका महिन्याचे कॅशबॅक आणि सात दिवसांसाठी दुसऱ्या महिन्याचा कॅशबॅक क्रेडिट करणार आहे. ही ऑफर 30 जून 2020 पर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने या ऑफरचा फायदा घेण्यासाठी युजर्सला सिटी बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन टाटा स्कायच्या अकाउंटचे रिजार्च करण्यास सांगितले आहे.

हेदेखील वाचा- Tata Sky च्या SD, HD सेट-अप बॉक्सच्या किंमतीत वाढ

मार्च महिन्यात टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) यांनी National Tariff Order 2.0 लागू केले आहे. त्यानंतर टाटा स्कायने (Tata Sky) त्यांच्या SD आणि HD सेट-अप बॉक्सच्या किंमतीत देखील वाढ केली होती. टाटा स्कायच्या SD आणि HD STBs ची किंमत 1399 वरुन 1499 केली होती. तसेच टाटास्कायने प्रायमरी कनेक्शनच्या किंमतीसह मल्टी टीव्ही कनेक्शच्या किंमती सुद्धा वाढवल्या आहेत. याआधी SD STB च्या सेकेंडरी कनेक्शनच्या किंमती 1299 रुपयांवरुन 1399 रुपये केले आहे. तर HD सेकेंडरी कनेक्शनच्या किंमती 1199 रुपये झाल्या आहेत.