Tata Sky च्या 10 सर्विसेस लॉकडाउनच्या काळात फ्री, App वर पाहता येणार स्वस्त पॅक

आता कंपनीने ग्राहकांच्या शिखाला परवडतील असे पॅकेज आणले आहेत. या पॅकेजची किंमत ग्राहकांना टाटा स्कायच्या अॅपवरुन पाहता येणार आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतातील सर्वात मोठी डिटीएच कंपनी टाटा स्काय  (Tata Sky) त्यांच्या ग्राहकांसाठी नवे नवे पॅकेज घेऊन येतात. आता कंपनीने ग्राहकांच्या शिखाला परवडतील असे पॅकेज आणले आहेत. या पॅकेजची किंमत ग्राहकांना टाटा स्कायच्या अॅपवरुन पाहता येणार आहेत. मोबाईल अॅपमध्ये तुम्हाला स्वस्त किंमतीतील पॅकेज निवडणता येणार आहे. त्याचसोबत कंपनी लॉकडाउनच्या काळात 10 सर्विसेस फ्री सुद्धा ग्राहकांना देणार आहेत.यापूर्वी टाटा स्कायच्या ग्राहकांना जे चॅनल्स पाहायचे नाहीत त्याचे सुद्धा पैसे द्यावे लागत होते. काही चॅनल्साठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत होते. मात्र टाटा स्कायच्या ऑप्टिमायजेशन आणि ट्रायचच्या नॅशनल टॅरिफ ऑर्डरनंतर त्यांना टीव्ही चॅनल्ससाठी अधिक पैसे द्यावे लागत नव्हते.

मात्र आता ग्राहकांना टाटा स्कायसह चॅनल्स पॅक्स सुद्धा ऑप्टिमाइज करता येणार आहेत. तसेच निवडलेल्या चॅनल्सवर सुद्धा डिस्काउंट दिला जाणार आहे. जर तुम्हाला ऑप्टिमायझेशनचे फिचरची सुविधा मिळत आहे की नाही तपासून पहायचे असल्यास कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे. टाटा स्काय कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीलर त्यांच्या 10 सर्विस सुद्धा ग्राहकांना फ्री देत आहेत. टाटा स्काय फिटनेस सर्विस, जी कंपनीची सर्वाधिक पॉप्युरल वॅल्यू अॅडेड सर्विस मधील एक आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना ती फ्री देण्यात येत आहे. त्याचसोबत अन्य सर्विसेस सुद्धा फ्री देण्यात येत असून त्यासंदर्भात अधिक माहिती कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा दिली आहे.(Jio, Airtel आणि Vodafone चा 50 रुपयांहून स्वस्त प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंग सह मिळणार फ्री डेटा) 

टाटा स्कायने अलीकडेच आपले वॉच पोर्टलही बाजारात आणले आहे. या वॉच पोर्टलवर, वापरकर्ते थेट टीव्ही तसेच टाटा स्कायच्या डीसीएचएच सेवेमध्ये ऑफर केले जाणारे चित्रपट आणि इतर कंटेंट पाहू शकतात. याशिवाय टाटा स्काय ने आणखी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या अंतर्गत ते वापरकर्त्यांना आपल्या खात्यातील शिल्लक तसेच इन्स्टंट रिचार्ज ऑप्शन, इमर्जन्सी टॉप-अप, चॅनेल पॅक तपशील आणि रीचार्जनंतर खाते रीफ्रेश करण्यास परवानगी यांसारख्या अनेक सुविधा मिळू शकतात.