Swiggy Launches 'Bolt' Service: स्विगी कंपनीने सुरु केली बोल्ट सेवा,10 मिनीटात फूड डिलेव्हरीचे दिले आश्वासन

या सुविधेत अवघ्या १० मिनीटांत फुड आणि कोल्ड ड्रिंक वितरीत केले जाईल. स्विगी आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर लॉन्च करणार आहे.

Swiggy (Photo Credits: PTI)

Swiggy Launches 'Bolt' Service: ऑनलाइन फूड ऑर्डरिंगची सुविधा देणारे लोकप्रिय कंपनी म्हणजे स्विगीने शुक्रवारी बोल्ट ही सेवा सुरी केली आहे. या सुविधेत अवघ्या १० मिनीटांत फुड आणि कोल्ड ड्रिंक वितरीत केले जाईल. स्विगी आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर लॉन्च करणार आहे. हैद्राबाद, मुंबई, दिल्ली, पुणे, चैन्नई आणि बेंगळुरू या सहा प्रमुख शहरांमध्ये ही सेवा आधीच कार्यरत आहे. पुढील काही आठवड्यांत ते आणखी शहरांमध्ये आणले जाईल. बोल्ट ग्राहकांच्या दोन किलोमीटरच्या परिघात निवडक रेस्टॉरंटमधून जलद अन्न वितरण सेवा देते. (हेही वाचा- भारतात टेलिग्राम लवकरच बंद होणार? त्याऐवजी वापरा 'हे' पाच मेसेजिंग अॅप)

येत्या आठवड्यात ही सेवा अधिक क्षेत्रांमध्ये आणली जाईल, असं स्विगी कंपनीने सांगितले आहे. बोल्ट बर्गर, कोल्ड ड्रिंग आणि हॉट ड्रिंग, नाश्त्याचे पदार्थ आणि बिर्याणी या सारखे पदार्थ ऑफर केले जाईल जे तयार करण्यासाठी किमान वेळ लागतो.

स्विगीने सांगितले की ते आइस्क्रीम, मिठाई आणि स्नॅक्स सारख्या तयार-पॅक डिशेसवर देखील लक्ष केंद्रित करेल. कंपनीने सांगितले की, विशेषतः, वितरण भागीदारांना (पुरवठा भागीदार) बोल्ट आणि नियमित ऑर्डरमधील फरकाबद्दल माहिती दिली जात नाही. याचा अर्थ असा आहे की डिलिव्हरीच्या वेळेनुसार त्यांना दंड किंवा प्रोत्साहन दिले जात नाही.

फूड मार्केटप्लेस, स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहित कपूर म्हणाले, “बोल्ट ही अतुलनीय सुविधा प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयातील पुढील ऑफर आहे. दहा वर्षांपूर्वी, स्विगीने सरासरी प्रतीक्षा वेळ 30 मिनिटांपर्यंत कमी करून अन्न वितरणात क्रांती आणली. आता आम्ही ते आणखी कमी करत आहोत...”