Top 5 Movie Streaming Apps: गुगल प्ले स्टोअर वरील या '5' अॅप्स वर तुम्ही घेऊ शकता सिनेमाचा आनंद!
कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात आपण आपला वेळ घालवण्यासाठी कित्येकदा सिनेमाचा पर्याय निवडला असेल. दरम्यान, गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या 5 अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही सिनेमाचा आनंद घेऊ शकाल.
Top 5 Movie Streaming Apps on Google Play Store: आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मन रिलॅक्स करण्यासाठी एखादा सिनेमा बघणं हा एक खूप चांगला पर्याय आहे. विविध भावनांचे एकत्रिकरण करणारी सिनेमा ही एक कलाकृती आहे. बहुतांश वेळा सिनेमामधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात तर मनोरंजनही होते. कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात आपण आपला वेळ घालवण्यासाठी कित्येकदा सिनेमाचा पर्याय निवडला असेल. दरम्यान, गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या 5 अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही सिनेमाचा आनंद घेऊ शकाल.
SonyLIV:
सोनीलिव्ह हा अत्यंत युजर फ्रेंडली अॅप असून यामध्ये तुम्ही सिनेमे आणि टीव्ही सिरिज स्ट्रिम करु शकता. या अॅपमध्ये तुम्ही लाईव्ह स्पोर्ट्स, आयपीएल आणि फुटबॉल सामने देखील पाहू शकता. या अॅपमध्ये मोबाईल टीव्ही चॅनल्स पाहण्यासाठी एक गाईड सुद्धा मिळतो. हा अॅप अॅनरॉईड 4.1 पेक्षा वरच्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोनवर चालतो.
TVF Play:
TVF Play या अॅपवर तुम्ही कोटा फॅक्टरी, ट्रिपलिंग, पिचर्स, परमन्टेंट रुममेट्स यांसारख्या लोकप्रिय वेबसिरीज बघू शकता. या अॅपवर असलेल्या वेबसिरीज आणि व्हिडिओज हे तुमच्या दैनंदिन जीवनातील घडामोडीशी निगडीत असतात. TVF Play हा अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन फ्री मध्ये डाऊनलोड करु शकता.
Airtel Xstream:
Airtel Xstream या अॅपवर तुम्ही बातम्या, मनोरंजनात्मक कार्यक्रम, संगीत, क्रीडा आणि लहान मुलांचे कार्यक्रम दाखवणाऱ्या 350 हून अधिक चॅनल्सचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. या अॅपमध्ये तुम्ही स्वत:ची Wish List देखील बनवू शकता. तसंच या मल्टी डिव्हाईस सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याला गुगल प्ले स्टोअरवर 4.4 स्टार रेटिंग आहे.
MX Player:
MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही लेटेस्ट मुव्हीज, व्हिडिओज, टीव्ही शोज आणि म्युझिकचा आनंद घेऊ शकता. भारतीय सिनेमांसोबतच हॉलिवूड मुव्हीज, टर्किश ड्रामा आणि कोरियन वेबसिरीज देखील पाहता येतील. MX Player मध्ये Picture-in-Picture mode हे अनोखे फिचर दिल्यामुळे अर्धवट पाहिलेला व्हिडिओ तेथूनच पुढे पुन्हा पाहू शकाल.
Amazon Prime Video:
Amazon Prime Video या अॅपमध्ये ऑनलाईन सोबतच व्हिडिओ डाऊनलोड करुन देखील पाहू शकता. हा अॅप मोबाईलवर चालवून टीव्हीला कनेक्ट करता येईल. यासोबतच फायर टीव्ही, मल्टीयुजर प्रोफाईल यांसारखे फिचर देखील या अॅपमध्ये मिळतील. एचबीओ, शो टाईम, स्टार्ज आणि सिनेमॅक्स यांसारख्या 100 हून अधिक चॅनल्सचा तुम्ही आस्वाद घेऊ शकाल.
गुगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करुन तुम्ही रिकाम्या वेळेत तुमच्या आवडीचे कार्यक्रम, सिनेमे यांचा आनंद घेऊ शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)