Oldest Water on Earth: बाबो! पृथ्वीवरील सर्वात जुन्या पाण्याचा शोध लागला; जाणून घ्या कशी आहे या 160 कोटी वर्षे जुन्या पाण्याची चव
पुढे बराच कालावधी उलटून गेला मात्र ऑक्सफोर्डकडून लवकर रिप्लाय आला नाही. त्यानंतर बार्बराने याबाबत अपडेट घेण्यासाठी कॉल केला असता, तिला कळवण्यात आले की हे पाणी 160 दशलक्ष वर्ष जुने आहे. या पाण्याबाबत रिसर्च करण्यासाठी तब्बल 4 वर्षे लागले होते
विविध देशांकडून अंतराळात अनेक गोष्टींबाबत संशोधन चालू असताना पृथ्वीवरही अनेक रहस्ये उलगडत आहेत. आता जगातील सर्वात प्राचीन, सर्वात जुन्या पाण्याचा (Oldest Water on Earth) शोध लागला आहे. असे म्हटले जात आहे की हे पाणी 160 दशलक्ष वर्ष जुने आहे. टोरोंटो युनिव्हर्सिटीच्या (University of Toronto) आयसोटोप जिओकेमिस्ट्रीच्या भू-रसायनशास्त्रज्ञ बार्बरा शेरवुड लोलर (Barbara Sherwood Lollar) यांनी या पाण्याचा शोध लावला आहे. सध्या हे पाणी कॅनेडियन विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालयात ठेवले आहे. कॅनडाच्या Ontario मधील Timmins नावाच्या ठिकाणी बार्बराने पाण्याचे हे नमुने गोळा केले होते.
या ठिकाणच्या तांबे, जस्त, चांदीच्या खाणीमध्ये बार्बरा व तिच्या टीमचे संशोधन चालू होते, त्यावेळी या खाणीत जगातील सर्वात जुन्याचे पाण्याचे नमुने मिळाले. या पाण्यावरून हे माहित होऊ शकते की सौर यंत्रणेत इतर ग्रहांवर कधी जीव होता की नाही. या पाण्याची चव अत्यंत खारट आहे. हे समुद्रीपाण्यापेक्षा 10 पट जास्त खारट आहे. बार्बरा शेरवुडने सांगितले की तिने प्रथम 1992 मध्ये टिम्मिन्सला भेट दिली होती तेव्हा तिने किड्ड क्रीक खाणीत प्रवास केला होता. पाण्याचे नमुने तपासणीसाठी ऑक्सफोर्डला पाठवण्यात आले होते. (हेही वाचा: निसर्गाचा चमत्कार; ब्रिटीश शास्त्रज्ञांना अंटार्क्टिकामध्ये पाण्याखाली 3000 फुटांवर अपघाताने सापडले जीव, Watch Video)
पुढे बराच कालावधी उलटून गेला मात्र ऑक्सफोर्डकडून लवकर रिप्लाय आला नाही. त्यानंतर बार्बराने याबाबत अपडेट घेण्यासाठी कॉल केला असता, तिला कळवण्यात आले की हे पाणी 160 दशलक्ष वर्ष जुने आहे. या पाण्याबाबत रिसर्च करण्यासाठी तब्बल 4 वर्षे लागले होते. जगातील सर्वात जुने पाणी तिला सापडले आहे यावर बार्बराला विश्वासच बसत नव्हता. या 160 कोटी वर्ष जुन्या पाण्यात एंजिनियम नावाचे घटक देखील आहेत. आता शास्त्रज्ञांना आशा आहे की या पाण्याद्वारे त्यांना पृथ्वीच्या इतिहासाशी संबंधित बर्याच गोष्टी कळू शकतील. ज्या गुहेतून बार्बराने पाण्याचा हा नमुना गोळा केला आहे, त्यामध्ये कोट्यावधी वर्षांपूर्वीची आणखी बरेच नमुने आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)