Surya Grahan Dec 2019 Live Streaming: 26 डिसेंबरचं कंकणाकृती सूर्यग्रहण ऑनलाईन कसं आणि कुठे पहाल?
पहा यंदाच्या वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण ऑनलाईन कसं पहाल?
कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) यंदा 26 डिसेंबर दिवशी अवकाशात पाहता येणार आहे. भारतासह महाराष्ट्रात हे सूर्यग्रहण दिसणार असल्याने खगोलशास्त्राबद्दल कुतुहल असणार्यांमध्ये या ग्रहणामध्ये विशेष उत्सुकता आहे. दक्षिण भारतामध्ये कोइम्बतूर,धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी,फाल्लकड, पायन्नूर,पोलची,पुडुकोटल,तिरूचीपल्ली,तिरूर येथे सुमारे 2-3 मिनिटं कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अनुभव घेता येणार आहे तर उर्वरित भागात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. ग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहणं अपायकारक आहे. पण नेटकर्यांना सोशल मीडीयामध्ये या ग्रहणाचा लाईव्ह अनुभव घेता येणार आहे. पहा यंदाच्या वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण ऑनलाईन कसं पहाल?
मुंबईमध्ये 26 डिसेंबरच्या सकाळी 8.04 वाजता सूर्यग्रहणाला सुरूवात होणार आहे. हे ग्रहण मध्य स्थितीमध्ये 9.22 वाजता येईल तर 10.55 वाजता पूर्णपणे सुटणार आहे. Surya Grahan 2019 Sutak Time: 26 डिसेंबर दिवशी दिसणार्या सूर्यग्रहणाचा सुतक काळ, ग्रहण काळ काय?
26 डिसेंबर 2019 चं सूर्यग्रहण लाईव्ह इथे पहा
मुंबई, ठाणे सह अनेक शहरांमध्ये अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर सारून सूर्यग्रहणाची स्थिती लाईव्ह पाहण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. मात्र हे ग्रहण पाहताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. उघड्या डोळ्यांनी थेट ग्रहण पाहण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.