IPL Auction 2025 Live

Solar Eclipse 2022 Indian Superstitions: शिजवलेले अन्न खाणे टाळण्यापासून गर्भवती महिलांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यापर्यंत, या गोष्टी आजही ग्रहणा दरम्यान पाळल्या जातात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ग्रहण लागल्यानंतर अनेक गोष्टी टाळल्या जातात. ग्रहणला अशुभ घटना मानली जाते, अनेकांच्या मनात अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या पासून अनेक जण आजही या सगळ्या गोष्टी पाळतात, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Solar Eclipse 2022 Indian Superstitions (File Image)

Solar Eclipse 2022 Indian Superstitions: भारतामध्ये दिसणारे 2022 मधले पहिले सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला दिसणार आहे.  हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, यूरोप आणि आफ्रिका खंडामध्ये पाहता येणार आहे. हे ग्रहण त्यांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता येणार आहे. मुंबईत हे ग्रहण संध्याकाळी 4.49 वाजता सुरू होईल. पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे. दरम्यान, दिवाळी सणामध्ये यंदाचं खंडग्रास सूर्यग्रहण येणार असल्याने अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ग्रहण लागल्यानंतर अनेक गोष्टी टाळल्या जातात. ग्रहणला अशुभ घटना मानली जाते, अनेकांच्या मनात अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या पासून अनेक जण आजही या सगळ्या गोष्टी पाळतात. ग्रहण लागल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या जातात आणि कोणत्या गोष्टी टाळतात त्याची यादी आम्ही घेऊन आलो आहोत.  हिंदू पौराणिक कथेनुसार, एक राक्षस, राहू, ज्याला केतू म्हणून ओळखले जाणारे स्वतंत्र शरीर देखील आहे, प्राचीन लोककथांच्या आधारे त्याने  सूर्य आणि चंद्राविरूद्ध सूड घेण्याची शपथ घेतली. यामुळे, राहू हा राक्षस  सूर्य आणि चंद्राला पकडतो आणि त्यांना गिळतो. ही घटना फार काळ टिकत नाही कारण राहूला हात नाही. या पौराणिक कथेनुसार लोक सूर्यग्रहणात काही कठोर नियमांचे पालन करतात.

चला तर मग, पाहूया