दिलासादायक! Oxford University च्या वैज्ञानिकांनी बनवलेली COVID-19 विरूद्धची लस माकडांवर दाखवतेय समाधानकारक परिणाम; व्हायरसची निर्मिती होण्याची प्रक्रिया थांबल्याचा संशोधकांचा दावा
ही एक दिलासादायक बातमी कोविड-19 वर लवकरात लवकर लस बनली जाईल अशी आशा अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.
कोरोनाचा मूळत: नायनाट करणारी लस बनविण्यासाठी जगभरातील सर्व वैज्ञानिक अहोरात्र काम करत आहेत. यातच एक दिलासादायक बातमी ऐकायला मिळत आहे. ती म्हणजे जगातील नामांकित विद्यापीठ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या वैज्ञनिकांनी कोविड-19 (COVID-19) वर बनविलेल्या लसीचे माकडांवर प्रात्यक्षिक करुन पाहिले आणि त्यांना सकारात्मक परिणाम झाल्याचे तपासात आढळून आला आहे. ही एक दिलासादायक बातमी कोविड-19 वर लवकरात लवकर लस बनली जाईल अशी आशा अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, चेडॉक्स व्हॅक्सिन आतड्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. तसेच इम्यून सिस्टमवरही काही परिणाम झाला नाही असे दिसून आले. 13 मे पासून माणसांवरही या लसीचे ट्रायल करणे सुरु झाले आहे. कोरोना व्हायरस कदाचित कधीच नष्ट होणार नाही; कोविड 19 सह जगण्याची जगाला सवय करुन घ्यावी लागेल- WHO चा गंभीर इशारा
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्ऱॉपिकल मेडीसीन चे प्राध्यापक स्टीफेन इवान्स ने सांगितले की, न्युमोनियावर आमि व्हायरस ही लस फायदेशीर ठरली असून इम्यून सिस्टमवर याचा काही परिणाम झाला नाही. ही सर्वात आनंदाची बातमी आहे.
किंग्स कॉलेज लंडन चे व्हिजिटिंग प्रोफेसर डॉ. पेनी वार्ड यांनी सांगितले की, परीक्षणा दरम्यान माकडांच्या आतड्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. कारण सार्स च्या लसीमध्ये आतड्यांवर परिणाम झाला होता.
जरी लोकांवर या लसीचा प्रयोग करणे सुरु झाले असले तरीही प्राण्यांवर प्रात्याक्षिकं सुरुच आहे. जेणे करुन ही लस पूर्णपणे कोरोनाशी लढा देण्यास सक्षम आहे की नाही ते कळेल. मात्र येथे एक प्रश्न उपस्थित राहतो तो ही लस माणसांवरही तितकीच प्रभावी ठरेल की नाही. त्यामुळे यावर आणखी काम सुरु असून लवकरच आपल्याला याचे अंतिम परिणाम पाहायला मिळतील.