Jupiter Opposition: 70 वर्षांनी 'गुरू' येणार पृथ्वीच्या सर्वात जवळ; कशी, कुठे, कधी पहाल ही खगोलीय घटना
NASA च्या माहितीनुसार, 26 सप्टेंबरला केवळ गुरू ग्रहाची परफेक्ट प्लेसमेंटची स्थिती निर्माण झालेली नाही तर गुरू पृथ्वी पासून देखील जवळ असल्याची ही मागील 70 वर्षांमधील घटना आहे.
आपल्या आकाशगंगेमधील सर्वात मोठा ग्रह 'गुरू' (Jupiter) 26 सप्टेंबरला पृथ्वीच्या (Earth) जवळ येणार आहे. या खगोलीय घटनेचा योगायोग तब्बल 70 वर्षांनी जुळून आला आहे. ही घटना
Jupiter Opposition म्हणून ओळखली जाते. जेव्हा एकाच वेळी सूर्य पश्चिमेला अस्त होतो आणि अन्य ग्रहाचा उदय पूर्वेकडे होतो तेव्हा सूर्य (Sun) आणि तो ग्रह एकमेकांच्या अगदी समोरासमोर येतात.
जेव्हा Jupiter Opposition घडून येते तेव्हा ग्रह मोठा असल्याचा आणि अधिक प्रखर असल्याचा भास होतो. अवकाशामध्ये अशा घटना दर 13 महिन्यांनी घडत असतात. NASA च्या माहितीनुसार, 26 सप्टेंबरला केवळ गुरू ग्रहाची परफेक्ट प्लेसमेंटची स्थिती निर्माण झालेली नाही तर गुरू पृथ्वी पासून देखील जवळ असल्याची ही मागील 70 वर्षांमधील घटना आहे. त्यामुळे खगोलीय घटनांचं आकर्षण असणार्यांना 26 सप्टेंबरचा दिवस खास असणार आहे. आकाशात या अद्भूत करणार्या नजार्याकडे पाहू शकणार आहे.
पृथ्वी आणि गुरू हे सूर्याभोवती एकाच वर्तुळामध्ये प्रदक्षिणा घालत नाहीत. त्यामुळे ते एकमेकांना विशिष्ट अंतरावरून ओलांडत असतात. पण एका वर्षात त्यांच्या कक्षा एकमेकांपासून जवळ आलेल्या असतात. यंदा गुरू आणि पृथ्वीमधील अंतर हे 365 मिलियन माईल्स असणार आहे. हे देखील नक्की वाचा: NASA ने शेअर केली Jupiter ची James Webb Space Telescope ने टिपलेली खास झलक.
गुरू ग्रहाला 26 सप्टेंबरला कसं कुठे पहाल?
गुरू ग्रहाला पाहण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही विशिष्ट, खास मोठ्या दुर्बिणीची गरज नाही. सामान्य दुर्बिणीच्या माध्यमातूनही तुम्ही सहज गुरू ग्रह पाहू शकाल. नासाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू ग्रहावरील तपशील पाहण्यासाठी 4 इंच किंवा त्यापेक्षा मोठी दुर्बिण आवश्यक आहे. सोबत काही ग्रीन, ब्लू फिल्टर्स आवश्यक आहे. 26 सप्टेंबरच्या रात्री चंद्राशिवाय 'गुरू' हा ग्रह आकाशात चमकणारा एकमेव ग्रह असणार आहे.