ISRO चे 2021 मधील पहिले अभियान; PSLV-C51/Amazonia-1 सह 18 उपग्रहांचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण (Watch Video)
Amazonia-1 या ब्राझीलियन उपग्रहासोबत आणखी 18 उपग्रह आज यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले आहेत.
इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशनचे (Indian Space Research Organisation) 2021 चे पहिले अभियान यशस्वी झाले आहे. Amazonia-1 या ब्राझीलियन उपग्रहासोबत आणखी 18 उपग्रह आज यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मधील श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतिश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Centre) मधून हे उपग्रह आज सकाळी 10.24 वाजता लॉन्च करण्यात आले आहेत. Polar Satellite Launch Vehicle (PSLV) रॉकेट मधून लॉन्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भगवतगीता आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटो घेऊन हे रॉकेट अंतराळात झेपावले आहे.
PSLV-C51 रॉकेटमध्ये ब्राझिलियन Amazonia-1 हे प्रमुख सॅटलाईट असून यासोबत 18 इतर सॅटलाईट सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत. Amazonia-1 हे National Institute for Space Research (NSIL) चे पृथ्वीचे ऑप्टिकल निरिक्षण करणारे सॅटलाईट आहे. NewSpace India Limited चे हे पहिले कमर्शियल मिशन आहे. 18 इतर उपग्रहांमध्ये IN-SPACe चे चार उपग्रह आणि NSIL चे 14 उपग्रह आहेत.
ANI:
हे मिशन PSLV रॉकेटसाठी सर्वात मोठे मिशन असणार आहे. हे रॉकेट 1 तास 55 मिनिटे आणि 7 सेकंद एवढा वेळ प्रवास करणार आहे. या यशस्वी लॉन्चनंतर भारताने एकूण 342 परदेशी सॅटलाईट अवकाशात लॉन्च केले आहेत.
Amazonia-1 या उपग्रहाचे वजन 637 किलोग्रॅम इतके आहे. अॅमेझॉन भागातील होणाऱ्या जंगलतोडीवर निगराणी ठेवण्यासाठी आणि पूर्ण ब्राझीलमधील शेतीचा आढावा घेण्यासाठी याचा वापर होणार आहे.