ISRO Launch PSLV-C54 Today:  इस्त्रो आज करणार 8 नॅनो सॅटेलाइट आणि ओशनसॅट-3 चे प्रक्षेपण, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

या उपग्रहांसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे.

ISRO (Photo Credits: Twitter)

भारतीय आंतराळ संस्था (Indian Space Research Organisation) अर्थाच इस्त्रो (ISRO) आज अवकाशात PSLV-C54 रॉकेटवर पृथ्वी निरीक्षण उपग्रह - ओशनसॅट - आणि इतर आठ ग्राहक उपग्रह श्रीहरीकोटा (Sriharikota ) येथून आकाशात सोडणार आहे. या उपग्रहांसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आज सकाळी 11.46 वाजता श्रीहरिकोटाहून हे उपग्रह अवशात झेपावतील. चेन्नईपासून 115 किमी अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये प्रक्षेपण पॅड उभारण्यात आले आहे.

इस्त्रोच्या या मोहिमेत प्राथमिक पेलोड, EOS-06 सुरुवातीला प्रक्षेपीत केला जाईल., त्यानंतर कक्षामध्ये बदल होईल, त्यानंतर लहान उपग्रह वेगळ्या सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षा (SSPO) मध्ये तैनात केले जातील. मिशन पूर्ण होण्यासाठी 8,271.36 सेकंद (फक्त दोन तासांपेक्षा जास्त) इतका कालावधी लागेल. (हेही वाचा, Vikram-S Prarambh Mission: भारतातील पूर्ण खासगी बनावटीच्या विक्रम रॉकेटचे अवकाशात उड्डाण, भारतीय आंतराळात विक्रमी पाऊल)

इस्त्रो अवकाशात सोडत असलेले बहुतेक ग्राहक उपग्रह खाजगी कंपन्यांचे नॅनो- आणि पिको- उपग्रह आहेत. आनंद नॅनोसॅटलाइट बेंगळुरूस्थित कंपनी पिक्सेलचा आहे, दोन थायबोल्ट पिकोसॅटलाइट हैदराबादस्थित ध्रुव स्पेसचे आहेत आणि चार अॅस्ट्रोकास्ट क्यूबसॅट यूएस-आधारित स्पेसफ्लाइटचे आहेत. भूतानसाठी ISRO चा INS-2B उपग्रह देखील उपग्रहांसोबत सोडला जात आहे.

इथे पाहता येईल उपग्रहाचे लाईव्ह प्रक्षेपण

पेलोड्स म्हणजे पृथ्वी निरीक्षण उपग्रह, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपग्रह आणि दोन थायबोल्ट उपग्रह जे भारतीय प्रक्षेपण वहनाद्वारे प्रक्षेपित केले जाणारे भारताचे पहिले स्वदेशी हौशी रेडिओ उपग्रह आहेत.

EOS-06 उपग्रह 742.79 किमी उंचीवर 1, 032.68 सेकंदांनंतर SSPO मध्ये वेगळा होईल. त्यानंतर दोन थायबोल्ट 516.39 किमी उंचीवर 6,861.36 सेकंदांनी वेगळे होतील. दुसर्‍या SSPO मध्ये, त्यानंतर इतर उपग्रह आणि प्रक्षेपणानंतर 7,521.36 सेकंदात INS-2B सह समाप्त होईल.