Protect Mobile From Explosion: ओवर चार्जिंगमुळे मोबाईल स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ; कसे कराल तुमच्या मोबाईलचे संरक्षण? जाणून घ्या टिप्स
स्मार्टफोनचा स्फोट का होतो? फोनच्या स्फोटांची कारणे? ते टाळण्यासाठीचे उपाय जाणून घेऊयात.
Protect Mobile From Explosion: अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या स्फोटांच्या (Smartphone Explosion)घटना वाढल्या आहेत. स्मार्टफोनचा स्फोट का होतो? स्फोट टाळण्यासाठी काय करायला हवे? कोणती काळजी घ्ययला हवी? याबाबत काही टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे. स्मार्टफोनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे का, बॅटरी खराब आहे का, ओरिजिनल चार्जरने फोन चार्ज करत आहात का, ओवर चार्जिंग तर होत नाही ना हे पाहण गरजेच आहे.
1. मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट
फोनचा स्फोट होण्याचे मुख्य कारण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट. स्मार्टफोनला उर्जा देणारी लिथियम-आयन बॅटरी फोनमध्ये बसवण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरिंग दरम्यान काही बिघाड झाल्यास फोनचा स्फोट होऊ शकतो. हे सहसा घडते जेव्हा बॅटरी गंभीर तापमानापर्यंत पोहोचतात. स्वस्त बॅटरीमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असते.
2. कोणत्याही चार्जरने फोन चार्ज करणे
ही एक सामान्य चूक आहे जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. ओरिजिनल चार्जर व्यतिरिक्त तुम्ही फोन इतर कोणत्याही चार्जरने चार्ज केल्यास ते धोकादायक ठरू शकते. थर्ड-पार्टी चार्जरमध्ये तुमच्या हँडसेटच्या चार्जरप्रमाणे क्षमता नसते. अनेक चार्जर तुमच्या मूळ चार्जरसारखे दिसू शकतात परंतु त्यांचा वापर तुमच्या फोनला नुकसान पोहोचवू शकतो. थर्ड पार्टी चार्जरमुळे फोन फुटण्याच्या घटनाही अनेकवेळा पाहायला मिळाल्या आहेत.
3. रात्रभर चार्जिंग
थर्ड-पार्टी चार्जर वापरण्याव्यतिरिक्त, बॅटरी जास्त गरम होण्याची इतर कारणे आहेत. रात्रभर चार्जिंग हे मुख्य कारण आहे. आपल्यापैकी बहुतेकांना झोपताना फोन चार्जिंगवर ठेवण्याची सवय असते. त्यामुळे बॅटरी जास्त गरम होणे, ओव्हरचार्जिंग, शॉर्ट-सर्किट आणि काहीवेळा स्फोट देखील होतो. बऱ्याच स्मार्टफोन्समध्ये आता अशी चिप असते जी बॅटरीची पातळी 100 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावर विद्युत प्रवाह थांबवते. तथापि, अजूनही काही स्मार्टफोन आहेत. ज्यांमध्ये हे वैशिष्ट्य नाही. अशा परिस्थितीत असे स्मार्टफोन रात्रभर चार्जिंगवर ठेवणे धोकादायक ठरू शकते.
4. प्रोसेसर ओव्हरलोड
तुमचा फोन जास्त गरम होण्यात प्रोसेसर महत्त्वाचा ठरतो. पबजीसारखे हेवी ग्राफिक्स ॲप्स मल्टी-टास्किंग गेम खेळताना फोनमध्ये थर्मल समस्या आढळून आल्या आहेत. या कारणामुळे हँडसेट गरम होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही फोनवर जास्त भार टाकणे थांबवावे. जेणेकरुन तुम्ही सुरळीत प्रक्रिया करून ब्लास्टिंगच्या समस्येपासून मोबाईलला दूर ठेवू शकता.
5. फोन सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा
जास्त उष्णतेमुळे फोन गरम होतो. त्याची बॅटरी खराब होऊ शकते. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडसारखे वायू तयार होऊ लागतात. या वायूंमुळे बॅटरी फुगते आणि बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. म्हणून, कारमध्ये हँडसेट न ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि दीर्घ काळासाठी थेट सूर्यप्रकाशात देखील येऊ नये.
6. पाण्याचा संपर्क
जेव्हा हँडसेट वॉटरप्रूफ नव्हते तेव्हा पाण्यामुळे बॅटरी फुगण्याच्या अनेक घटना ऐकल्या आणि पाहिल्या असतील. आजकाल अगदी परवडणारे हँडसेट किमान स्प्लॅश-प्रतिरोधक कोटिंगसह येतात जे फोनला पाण्यापासून वाचवतात.
7. वापरकर्तांचा निष्काळजीपणा
अनेक वेळा यूजर्सच्या चुकांमुळे स्मार्टफोन फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना काही काळापूर्वी Realme 5 सोबत घडली होती. स्फोट झाला तेव्हा वापरकर्ता त्याची बाईक चालवत होता. अचानक फोनचा स्फोट झाल्याचा दावा कंपनीने चाचणीदरम्यान केला आहे. त्यामुळे फोनची बॅटरी खराब झाली. मदरबोर्ड खराब झाला.
फोन स्फोट टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
फोनद्वारे दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्या. फोनच्या बॅटरीमध्ये सूज येणे, फास्ट- थर्ड पार्टी चार्जर वापरणे, फोन जास्ट चार्ज करणे, याकडे लक्ष द्या.